नवी दिल्ली
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी नवं नोटिफिकेशन जारी केलं आहे. या नोटिफिकेशनमध्ये पैसे काढण्याच्या नियमांबाबत सांगण्यात आलं आहे. या नव्या नोटिफिकेशननुसार, बँकेकडून आता होम ब्राँच नसलेल्या इतर ब्राँचमधून रोख पैसे (Cash Withdrawal) काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. तसंच ग्राहक Non-Home ब्राँचमधून 25000 रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकणार आहेत.
पैसे काढण्याचे बदलेले नियम
एका दिवसात काढता येणार 25000 रुपये
१) SBI ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. कोरोना काळात आपल्या ग्राहकांसाठी SBI ने चेक आणि पैसे काढण्याच्या फॉर्मद्वारे Non-Home ब्राँचमधून रोख रक्कम काढण्याची मर्यादा वाढवली आहे. आता ग्राहक आपल्या जवळच्या ब्राँचमधून एका दिवसांत आपल्या सेविंग अकाउंटमधून 25000 रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकतात.
२) चेकद्वारे दुसऱ्या शाखेतून १ लाख रुपयांपर्यंत पैसे काढता येणार आहेत.
३) थर्ड पार्टी म्हणजे ज्याला चेक देण्यात आला आहे. त्याला पैसे काढण्याची मर्यादा ५०,००० रुपये केली आहे.
नवीन नियमाची मुदत
एसबीआयने तातडीने हे नवीन नियम लागू असून हा नवीन नियम ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत लागू राहणार आहेत.
नवीन नियमांसह अटी
पैसे काढण्याच्या नवीन नियमांसह एसबीआयने काही अटी देखील लागू केल्या आहेत. थर्ड पार्टी विड्रॉल फॉर्मद्वारे रोख रक्कम काढू शकणार नाही. तसंच, थर्ड पार्टीकडे केवायसी कागदपत्र असणे गरजेचे आहे.
1 जूनपासून लागू होणार EPFO चा नवा नियम,
अटी पूर्ण न केल्यास PF अकाउंट होल्डरला बसेल मोठा फटका
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रॉविडेंट फंड अकाउंट होल्डर्ससाठी (PF Subscribers) 1 जून 2021 पासून नवा नियम लागू (EPFO New Rule) करत आहे. या नियमानुसार असलेल्या अटी पूर्ण न केल्यास, कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या कंपनीशी (Employer) याबाबत बोलून ही अट पूर्ण करावी, असं सांगण्यात आलं आहे.
ईपीएफओच्या नव्या नियमांतर्गत, नियोक्ताला (Employer) पीएफ अकाउंट आधारशी लिंक (PF Account link to Aadhaar) करण्याची जबाबदारी दिली आहे. जर नियोक्ताकडून अकाउंट आधारशी लिंक केलं न गेल्यास, कर्मचाऱ्याच्या अकाउंटमध्ये कंपनीकडून दिली जाणारी रक्कम (PF Contribution) रोखली जाऊ शकते.
UAN नंबर, आधारशी वेरिफाय करणं आवश्यक -
EPFO च्या नव्या नियमानुसार, पीएफ सब्सक्रायबर्सचा UAN नंबर आधारशी वेरिफाईड होणं गरजेचं आहे. ईपीएफओने सामाजिक सुरक्षा संहितेच्या कलम 142 (Social Security Code) अंतर्गत हा निर्णय घेतला आहे.
नियोक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत, की 1 जून 2021 नंतर जर कोणतं अकाउंट आधारशी लिंक नसेल किंवा UAN आधारशी वेरिफाईड केलं नसेल, तर इलेक्ट्रॉनिक चालान रिटर्न (ECR) भरता येणार नाही. त्यामुळे सब्सक्रायबर्ससाठी आपलं पीएफ अकाउंट आधारशी लिंक करणं महत्त्वपूर्ण आहे.
घरबसल्या पीएफ अकाउंट करा लिंक -
EPFO नुसार, पीएफ खातं आधारशी लिंक नसेल आणि UAN वेरिफाईड नसेल, तर अशा परिस्थितीत नियोक्ता, अर्थात कंपनीकडून दिलं जाणारं पीएफ योगदान थांबवलं जाऊ शकतं. ईपीएफओने नियोक्तांसाठी या संदर्भात एक अधिसूचनाही जारी केली आहे.
पीएफ अकाउंट होल्डरचं अकाउंट आधारशी लिंक नसल्यास, तो ईपीएफओ सर्विसचा वापर करू शकत नाही. PF अकाउंट होल्डर ईपीएफओ वेबसाईट www.epfindia.gov.in वर लॉगइन करुन आपलं अकाउंट घरबसल्या आधारशी लिंक करू शकता.
Leave a comment