बीड । वार्ताहर

लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला 30 मे रोजी सात वर्ष पूर्ण होत आहेत. या सात वर्षाच्या कालखंडात मा.नरेंद्र मोदी यांनी अनेक जनहिताचे व ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख जगासमोर सिद्ध झाला. अशा कार्तुत्वसिध्द नेतृत्वाचा गौरव आणि कार्याचा सन्मान करण्याकरिता बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा हि संघटन हा मंत्र घेऊन जिल्ह्यातील कोरोनाबाधित 200 गावांमध्ये विविध सामाजिक उपक्रम व मदत सेवा आणि कोरोनाच्या संघर्षात विविध उपाययोजना राबवून केंद्र सरकारचे सप्तवर्षपूर्ती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांनी दिली आहे.

सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने ग्रामीण भागात भयानक मुसंडी मारली असून मृत्युच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोनाच्या लढाईत भाजपाचा कार्यकर्ता अविरतपणे कार्य करत आहे. 30 मे रोजी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला यशस्वी 7 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने कोणतेही जाहीर कार्यक्रम न घेता सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सामाजिक उपक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी आज खा.डॉ.प्रितमताई मुंडे,मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी ऑनलाईन बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आ.लक्ष्मण पवार,आ.नमिताताई मुंदडा,माजी आ.भीमसेन धोंडे,केशवराव आंधळे, रमेशराव आडसकर,जि.प.सदस्य अशोक लोढा,विजयकांत मुंडे, शंकर देशमुख,प्रा.देविदास नागरगोजे यांच्यासह मंडल अध्यक्ष व पदाधिकारी सहभागी झाले होते.30 मे मोदी सरकार सप्तपुर्ती व 3 जून स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे पुण्यस्मरणदिन या निमित्ताने रक्तदान व प्लाझ्मा डोनेशन,न्टीजेन टेस्ट शिबिराचे आयोजन, ग्रामीण भागात निर्जंतुकीकरन फवारणी, मास्क सॅनिटायझरचे वाटप, प्रतिकारक शक्ती वाढवणार्‍या औषधींचे वाटप, कोरोनायोद्धा व कर्मचार्‍यांचा सन्मान करणे अशा विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे. या सेवाकार्यात भाजपा युवामोर्चा, महिला आघाडी, विद्यार्थी आघाडी यांच्यासह सर्व आघाड्या सहभागी होणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि प्रत्येक पदाधिकार्‍याने दोन गावांची निवड करून तेथे सामाजिक उपक्रम राबवण्याचे ठरले. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी तातडीने सर्व पदाधिकार्‍याकडून गावांची नावे व सेवा सूचीची माहिती घेऊन त्याप्रमाणे नियोजन करण्याची सूचना खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी दिली आहे. राजेंद्र मस्के यांनी प्रस्ताविक करून बीड जिल्ह्यात भाजपातर्फे चालू असलेल्या सेवा कार्याची सविस्तर माहिती बैठकीत मांडली.


खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांचे अभिनंदन

नुकतेच रासायनिक खतांची भाववाढ झाली असल्याने शेतकरी वर्गात चिंता निर्माण झाली होती. आर्थिक संकटात होरपळनार्‍या शेतकरी बांधवांना आर्थिक दिलासा आवश्यक होता. परिस्थितीतीचे गांभीर्य लक्षात घेऊन खा.डॉ.प्रितमताई यांनी शेतकर्‍यांची व्यथा मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर व्यक्त करून दिलासा देण्याची मागणी केली.मा.पंतप्रधान मोदी यांनी खत अनुदानाच्या रक्कमेत वाढ करून खतांचे भाव स्थिर ठेवले शेतकर्‍यांना महागाईची झळ पोहोचू दिली नाही. खा.प्रितमताई यांनी बळीराजाच्या हितासाठी केलेल्या तत्पर कार्याचे अभिनंदन करणारा ठराव जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी मांडला व बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने शंकर देशमुख यांनी संमत केला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.