बीड । वार्ताहर
कोरोना या आजाराने मयत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना स्व.गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत लाभ देण्यात यावा अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या दिड वर्षांमध्ये महाराष्ट्रातील अनेक गरीब शेतकऱ्यांचा मृत्यू कोरोना या आजारामुळे झालेला असुन या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असुन शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात अपघातात मयत झालेल्या अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी स्व.गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजना सुरु असुन अपघातात मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात येते. तसेच कोरोना हा आजार अपघातच असुन कोरोनामुळे झालेले मृत्यु अपघाती समजण्यात येऊन कोरोनाने झालेल्या मृत्युचा समावेश या योजनेत करण्यात यावा व कोरोनाने मृत्यु झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना स्व.गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
Leave a comment