दिवसभरात जिल्ह्यात 868 जण कोरोनामुक्त
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोनाचा समुह संसर्ग आता आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र दिसू लागले आहे. सोमवारी (दि.24) जिल्ह्यात 16 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. तसेच 824 नवे रुग्ण निष्पन्न झाले तर 868 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
जिल्ह्यात रविवारी 6 हजार 529 जणांची चाचणी केली गेली. त्याचे अहवाल सोमवारी दुपारी प्राप्त झाले. यात, 824 नवे रुग्ण आढळले तर, 5 हजार 705 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. नव्या बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 57, आष्टी 182, बीड 201, धारुर 44, गेवराई 54, केज 78, माजलगाव 51, परळी 21, पाटोदा 65, शिरुर 49 व वडवणी तालुक्यातील 22 जणांचा समावेश आहे. दरम्यान मागील चोवीस तासांत 16 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 82 हजार 43 इतकी झाली असून पैकी 74 हजार 467 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर आतापर्यंत 1877 जणांचा बळी गेला असून सध्या 5 हजार 699 रुग्ण उपचाराधिन असल्याची माहिती सीइओ अजित कुंभार, डीएचओ आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी पी. के. पिंगळे यांनी दिली.
Leave a comment