तहसीलदार,आरोग्य अधिकारी, बीडीओंच्या हस्ते उद्घाटन
धोंडराई । वार्ताहर
सगळीकडेच सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून रुग्णालये हाऊसफुल्ल झाले आहेत. यातच कोव्हीड रुग्णांना उपचार घेण्यासाठी शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात ही बेड शिल्लक नाहीयेत अशा परिस्थितीत गेवराई तालुक्यातील धोंडराई गावच्या भुमीपुत्रांनी एकत्रीत येवुन गावात कोव्हीड केअर सेंटर सुरू केलंय. धोंडराई येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये हे सेंटर चालु केले असुन या सेंटरमध्ये आता गावासह परिसरातील रुग्णांच्या उपचारासाठीचघ सोय होणार आहे येथे दाखल होणार्या रुग्णांना आरोग्य प्रशासनाकडून वैद्यकीय सेवा पुरविण्यात येणार आहे .
गेवराई तालुक्यातील सर्कल चे मोठे गाव म्हणुन धोंडराई ची ओळख आहे. गावातच कोव्हीड केअर सेंटर चालु करण्याची युक्ती गावातील शिक्षक तात्यासाहेब मेघारे व त्यांच्या सहकार्यांना सुचली आणि त्यांनी ते आपली आई धोंडराई ग्रुपवर शेअर केले तसेच कोव्हीड सेंटर साठी सर्वांनी मदत करण्याचे सांगितले व सांगितल्या प्रमाणे मदत जमाही झाली मग काय अत्यंत कमी दिवसांत कोव्हीड सेंटरमधील लाइट फिटींग,पाण्याची सुविधा, रुग्णांसाठी गादी व उशींची सुवीधा ही सर्व तयारी उरकुन
शुक्रवारी (दि.14) रोजी हे कोव्हीड सेंटर प्रत्यक्षात सुरू करण्यात आले आहे.गावातील व परिसरातील रुग्णांसाठी गावातच उपचाराची सोय व्हावी यासाठी तहसीलदार व आरोग्य अधिकारी यांच्याकडे गावातील शिक्षक तात्यासाहेब मेघारे व त्यांच्या सहकार्यांनी प्रस्ताव ठेवला होता त्यानंतर गावातील लोकांशी बैठक घेण्यात आली त्यानुसार आज गावातील जिल्हा परिषद शाळेत हे कोव्हिड सेंटर चालु करण्यात आले.या कोव्हिड सेंटरचे उद्घाटन तहसीलदार सचिन खाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय कदम, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप, शिक्षणाधिकारी कुलकर्णी ,कराड यांच्या हस्ते करण्यात आले असुन यावेळी माजी सभापती भरतराव खरात, जि.प सदस्य फुलचंद बोरकर, चेअरमन नारायण नवले, सरपंच अशोक वंजारे, मच्छिंद्र खरात,भागवत ढेंबरे,गौरव खरात, मच्छिंद्र सपकाळ,अरुण खरात तात्यासाहेब मेघारे, धर्मराज करपे,प्रकाश खरात, जगन्नाथ जाधव, नामदेव खेडकर ,रामदास महाराज,विलास शिंदे जगन्नाथ घोडके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave a comment