जिल्ह्यात 75 मृत्यूची नोंद; कोरोनाचे 1015 नवे रुग्ण

बीड  । वार्ताहर

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अवंलबिलेल्या कडक लॉकडाऊनचे परिणाम आता दिसू लागले असून रुग्णसंख्या घटू लागली आहे  गुरुवारी (दि.13) जुन्या 51 तर 24 तासांतील 18 बळींची नोंद झाली. तसेच 1015 नव्या रुग्णांची भर पडली तर 1317 कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात बुधवारी (दि.12) 4283 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. याचे अहवाल गुरुवारी प्राप्त झाले. यात 3238 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 1015 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 130, आष्टी 129, बीड 256, धारुर 60, गेवराई 91, केज 173, केज 139, माजलगाव 51,परळी 45, पाटोदा 38, शिरुर 52, वडवणी 24 जणांचा समावेश आहे. एकूण बाधितांचा आकडा 71 हजार 263 इतका झाला आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 63 हजार 196 इतकी झाली आहे. जुन्या 51 तर 24 तासांत मृत्युमुखी पडलेल्या 18 जणांची नोंद नोंद आरोग्य विभागाकडे झाली. त्यामुळे बळींचा आकडा 1322 इतका झाला आहे. सध्या 6 हजार 745 रुग्ण उपचाराधिन असल्याची माहिती जि.प. सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.पी.के. पिंगळे यांनी दिली.
दरम्यान विनाकारण रस्त्यावर भटकणार्‍यांची धरपकड करुन अँटीजेन चाचणी करण्याची मोहीम सुरु आहे. गुरुवारी (दि.13) जिल्ह्यात  विनाकारण घराबाहेर फिरणार्‍या 227 जणांची अँटीजन चाचणी करण्यात आली. यात 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर उर्वरित लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.