अपमानास्पद वागणूक दिल्याचा
पोलिसांवर आरोप; एसपींनी मागवला खुलासा
बीड । वार्ताहर
खासगी वाहनाने नेकनुरमार्गे पुढे जाणार्या अपर आयुक्त अविनाश पाठक यांचे वाहन नेकनूर पोलीसांनी शनिवारी (दि.) रस्त्यात अडवले. संबधित वाहनावर वाहनावर पूर्वीचा साडेआठ हजार रुपयांचा दंड असून तो भरावा लागेल असा दम भरला. शिवाय मास्क का लावला नाही, यावरुनही धारेवर धरले. त्यामुळे अविनाश पाठक संतप्त झाले. दरम्यान वरिष्ठ अधिकार्यांचा फोन आल्यावर पोलीस ताळ्यावर आले.सहायक निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी धाव घेतल्यावर पाठक यांचे वाहन मार्गस्थ झाले. नेकनूर येथे घडलेल्या प्रकाराबद्दल संबंधित पोलीस अंमलदारांकडून खुलासे मागविले जाणार आहेत. खुलासे प्राप्त झाल्यानंतर ते असमाधानकारक असतील तर योग्य ती कारवाई करु असा इशारा पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी दिला आहे.
सध्या बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कडक लॉकडाऊन सुरु आहे. जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठिकठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जाते. अनावश्यक घराबाहेर पडलेल्यांची अँटीजन चाचणी करुन वाहतूक अधिनियमानुसार दंडात्मक कारवायाही केल्या जात आहेत. शनिवारी (दि.8) अपर आयुक्त अविनाश पाठक यांचे वाहन नेकनूर पोलीसांनी रस्त्यात अडवले. पाठक यांच्याकडे सध्या बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील शासकीय,खासगी रुग्णालयात उपचार घेणार्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्याची जबाबदारी असून यासाठी ते अहोरात्र कार्यरत आहेत. यासाठी अविनाश पाठक यांना एक खासगी वाहन दिलेले आहे. नेकनूर पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. वाहनावर पूर्वीचा साडेआठ हजार रुपयांचा दंड असून तो भरावा लागेल असा दम भरला. शिवाय मास्क का लावला नाही, यावरुनही धारेवर धरले. त्यामुळे पाठक यांना संताप अनावर झाला. दरम्यान, सहायक निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी धाव घेतल्यावर पाठक पुढील प्रवासाला रवाना झाले. मात्र या घटनेमुळे बीड पोलिसांच्या अरेरावीचा अनुभव अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, औषधी कर्मचार्यांनतर थेट अप्पर आयुक्तांनाही आला.
Leave a comment