अर्धा तास खंडित होता ऑक्सिजन पुरवठा

 

 

नाशिक 

 

 नाशिकमध्ये पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक (Nashik Oxygen Leak) झाल्याची घटना घडली आहे. यात गॅस सर्वत्र पसरल्यानं एकच गोंधळ उडाला. याशिवाय रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी 171 जण ऑक्सिजनवर आहेत. तर, व्हेंटिलेटरवर आणी अत्यवस्थ 67 रुग्ण आहेत. टँक लीक झाल्यानंतर तब्बल अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत झाला होता. यादरम्यान 22 रुग्ण दगावल्याची माहिती समोर आली आहे. लीक झालेला ऑक्सिजन टँक 20 KL क्षमतेचा होता.

याबाबत बोलताना पालिका आयुक्तांनी सांगितलं होतं, की झाकीर हुसेन रुग्णालयात 150 रुग्ण होते. यातील 23 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. याप्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी केली जाईल, असंही आयुक्तांनी सांगितलं. व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालेलं चालत नाही. त्यामुळे, या घटनेत 10 ते 12 रुग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती मिळाली असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, आता याप्रकरणाबाबतची अधिक माहिती समोर आली असून यात आतापर्यंत 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास येथील गॅस प्लांटमधून सिलिंडरमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू होते. अचानकपणे टँकच्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणावर गॅस बाहेर येऊन गॅसगळती सुरू झाली. दरम्यान, या पार्श्वभूमीवर बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाच्या हवाल्याने सांगितले की या रुग्णालयातील व्हेंटिलेटरवर असणारे काही रुग्ण दगावले आहेत.

गॅस फ्लांटच्या टँकमधून गॅस गळती झाली. अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी तत्काळ दाखल झाले आहेत. गॅसगळती होत असलेल्या ठिकाणी तात्पुरती दुरूस्ती करुन गॅस गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले. गॅस प्लांटचे देखभाल करणारे तज्ज्ञ टेक्निशियन यांना पाचारण करण्यात आले.

टेक्निशियन टँकमधील गॅस गळतीचे शोध घेऊन दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात कोरोना रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. गॅस गळतीमुळे रुग्णालयात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. 

दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयाकडील १५ जम्बो सिलिंडर तातडीने झाकीर हुसेन रुग्णालयास दिले आहेत. तसेच खबरदारी म्हणून ३ डूरा सिलिंडरची बॅकअप म्हणून तरदूत केली असल्याची माहिती कोरोना नोडल अधिकारी डॉ. निखिल सैंदाने यांनी बोलताना दिली.

त्यामुळेच अत्यवस्थ असलेल्या २२ रुग्णांना जीव गमवावा लागला...

टँकरमधून अचानक ऑक्सिजन गळती झाल्याने पाईपलाइनद्वारे रुग्णांना पुरविल्या जाणाऱ्या ऑक्सिजनचे प्रेशर कमी झाले. परिणामी, व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन मिळू शकला नाही, त्यामुळे आधीच अत्यवस्थ असलेल्या २२ रुग्णांना जीव गमवावा लागला, तसेच आणखी काही रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

२२ जण दगावले : जिल्हाधिकारी 

झाकीर हुसेन रुग्णालयातील घटनेत व्हेंटिलेटरवरिल २३ पैकी २२ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. टॅकरमधून रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीत ऑक्सिजन भरले जात असताना तांत्रिक दोष निर्माण झाला. त्यामुळे ऑक्सिजनची गळती झाली. ही खासगी कंपनीची टाकी आहे. तांत्रिक दोष दूर करण्यात आला आहे. पण यादरम्यान विस्कळितपणामुळे ही घटना घडली आहे. सरकारला सर्व माहिती देण्यात आली असून पुढील आदेश आल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, आजूबाजूच्या रुग्णालय व जिल्हा रुग्णालयातील सिलेंडर आणून ऑक्सिजन पुरवठा सध्या सुरळीत केल्याचं मांढरे म्हणाले.

 

दीड तासांनी गळती रोखण्यास यश

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानंतर या रुग्णालयात अग्निशमन दल दाखल झाले होते. या ठिकाणी ऑक्सिजन टाकीतील गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरु होते. जवळपास एक दीड तासाने ही ऑक्सिजन गळती रोखण्यास अग्निशमन दलाला यश आले. दरम्यान या घटनेमुळे रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.

दरम्यान ही घटना नेमकी कशी घडली, हा ऑक्सिजन टँक लीक कसा झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या हलगर्जीपणामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

 

अशी लागली ऑक्सिजनची टाकीला गळती

टाकीत दुपारी १२ वाजेच्या सुमारास ऑक्सिजन भरला जात होता. त्याचवेळी टाकीला जोडलेल्या पाईपलाईमध्ये दाब वाढला. परिणामी पाईपलाईन जोडणारे नोझल तुटले. फुटलेल्या भागातून ऑक्सिजन बाहेर पडू लागला. क्षणार्धात ऑक्सिजनचे पांढरे लोट हॉस्पिटलबाहेर दिसून आले. रुग्णालय प्रशासनाने तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. सुमारे पाऊण तासात गळती थांबवण्यात यश आले. परंतु तोपर्यंत रुग्णांना दिला जाणारा ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला होता. पाऊण तासानंतर गळती लागलेल्या नोझलची वेल्डिंग करण्यात आली.

ऑक्सिजनचा झाला तुटवडा-

 

गंभीर बाब म्हणजे रुग्णालयातील या ऑक्सिजनवर हा अक्सिजन अनेक गंभीर प्रकृतीच्या रुग्णांना लावण्यात आला होता. परंतु गळतीमुळे हा अक्सिजन वाया गेल्यामुळे रुग्णांना आता नवीन ऑक्सिजन कोठून उपलब्ध करून द्यावा अशी चिंता लागली आहे. नाशिकमध्ये आधीच ऑक्सिजनची कमालीची कमतरता आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळवताना नाकेनऊ येत आहे. त्यातच ऑक्सिजनचा साठा असलेल्या टाकीच्या पाईपलाईनलाच गळती लागल्याने घबराहट पसरली आहे.

 • कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईपलाईनला लागली गळती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल नाशिक, ऑक्सिजन, टाकी, डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटल, गळती, रुग्णांचे हाल, कोरोना.
 • हॉस्पिटलमध्ये १५७ रुग्ण दाखल आहेत

 • १३२ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत

 •  १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत

 • काही रुग्णांना बिटको हॉस्पिटलला स्थलांतरीत करण्याचे काम सुरु

 

वॉल्वमध्ये लीकेज असल्याने गळती : राजेश टोपे

स्थानिक प्रशासनाने कळवलं की, नाशिकमध्ये आलेल्या टँकरमधील वॉल्वमध्ये लीकेज असल्याने ऑक्सिजन वाया गेला. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण माहिती घेऊन परिपत्रक जारी केलं जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

 

राज्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळणे गरजेचे – फडणवीस

 

नाशिकमधील महापालिकेच्या डॉ.झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळती झाल्यामुळे ११ ते २२ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन टाकी लिकेज झाल्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा बंद झाला यामुळे गंभीर असलेल्या रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. नाशिकमध्ये घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. राज्यात अशी स्थिती पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने काळजी घ्यायला पाहिजे. जे रुग्ण गंभीर आहेत अशांना तात्काळ मदत केली पाहिजे तसेच काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करायचे असल्यास त्यांना शिफ्ट केले पाहिजे, मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सामील आहोत. असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, नाशिकमधील ऑक्सिजन लिकेज होऊन रुग्णांचा मृत्यू होणं हे दुर्दैवी आहे. याबाब सखोल चौकशी होत राहील परंतु राज्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे. आता रुग्णालयात जे पेशंट आहेत त्यांना योग्य उपचार मिळणं गरजेचे आहे. तसेत कोणत्या रुग्णांना शिफ्ट करायचे असल्यास त्यांना लवकर केले पाहिजे. तसेच अशी घटना पुन्हा घडणार नाही याचीही काळजी घेतली जाईल. ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सामील आहोत तसेच त्यांच्यासाठी प्रार्थनाही करु असे विरोधी पक्षेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

निष्काळजीपणामुळे आणखी किती बळी घेणार? : प्रवीण दरेकर

नाशिकमधील ऑक्सिजन गळती दुर्दैवी आहे. ही सर्वस्वी सरकारची चूक आहे, असं म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीका केली. तसचं निष्काळजीपणामुळे आणखी किती बळी घेणार असा सवालही विचारला. दरम्यान जबाबदार असणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.  

 

रुग्णालय परिसरात नातेवाईंकाच आक्रोश

रुग्णालय परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांचे नातेवाईक आक्रोश करताना दिसत आहेत. दोन तासांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्याने आमच्या कुटुंबीयांना प्राण गमवावे लागले असं त्या परिसरातील नातेवाईक म्हणत आहेत.

अमोल

 

अमोल व्यवहारे यांची आजी लीला शेलार ( वय - 60 वर्षं) याचं या घटनेत निधन झालं. ऑक्सिजनअभावी आजीचा मृत्यू झाला असं व्यवहारे यांनी सांगितलं.

विकी जाधव यांनी देखील त्यांची आजी या घटनेत गमावली आहे. "आजीची ऑक्सिजनची पातळी अचानकपणे खालावली, मी जेव्हा रुग्णालय कर्मचाऱ्यांना याबाबत विचारले तेव्हा आमच्याकडील ऑक्सिजन संपला आहे असं उत्तर मला मिळालं," असं जाधव यांनी माध्यमांना सांगितलं.

विकी जाधव

 

सखोल चौकशीची मागणी

"नाशिकमध्ये जे घडलं ते अत्यंत दुर्देवी आहे. हे अतिशय व्यथित करणारं आहे. अन्य रुग्णांना मदत पुरवून त्यांना आवश्यक असल्यास योग्य ठिकाणी हलवण्यात यावं. आम्ही याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी करतो", असं विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

नाशिकमध्ये झालेली घटना ही हलगर्जीपणामुळे आहे असं माजी खासदार किरीट सौमय्या यांनी म्हटलं.

"नाशिकच्या रुग्णालयात एवढा रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनचा पुरवठा अनियमित झाल्याने झाला आहे. मी नाशिकला 22 मार्च रोजी भेट दिली होती. म्युनिसिपल कमिशनर आणि सिव्हिल सर्जन यांना मी इशारा दिला होता. हलगर्जीपणासाठी ठाकरे सरकार आणि अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मी मागणी करतो. हे मृत्यू म्हणजे व्यवस्थेने केलेली कोव्हिड हत्या आहे," असं माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले.

कोरोना

 

गेल्या दोन महिन्यातली ही आठवी घटना असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

"नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील घटना धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे. ऑक्सिजन टाकीला गळती लागून बावीस जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यातली ही आठवी घटना आहे. कुठे शॉर्ट सर्किट होतं, रुग्ण दगावतात. याची चौकशी, अहवाल, कारवाई कशाचा कशाला पत्ता नाही. तातडीने याप्रकरणाची चौकशी करण्यात यावी. अन्य रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावं. मृत रुग्णांच्या नातेवाईकांना मदत मिळायला हवी," असं भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

नाशिकची घटना व्यथित करणारी आहे. मृतांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. मृत रुग्णांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सगळे सहभागी आहोत असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं.

Leave a comment

Filtered HTML

 • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
 • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
 • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

 • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
 • Lines and paragraphs break automatically.

Plain text

 • No HTML tags allowed.
 • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
 • Lines and paragraphs break automatically.