अंबाजोगाई । वार्ताहर

कोरोनाने महाराष्ट्रासह देशभरात सर्वत्र थैमान घातले आहे.कोरोनाला आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.नुकतीच राज्यातील सर्व आमदारांना त्यांच्या स्थानिक निधीतून एक कोटी रूपये कोरोना विरुद्धच्या उपाय योजनांसाठी खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे.त्यानंतर तत्काळ निर्णय घेत केज मतदारसंघाच्या आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी स्वाराती रूग्णालयात कोरोना रूग्णांवर उपचारासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी स्थानिक आमदार निधीतून एक कोटी रूपयांचा निधी दिला आहे.यासोबतच आ.मुंदडांनी आतापर्यंत एकूण दिड कोटी रूपयांचा निधी कोरोना विरूद्धच्या लढाईसाठी दिला आहे.
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा संसर्गाचा वेग प्रचंड आहे.पहिल्या लाटेपेक्षा प्रतिदिन तिपटीने बाधित रूग्ण यावेळेस सापडत असून संपूर्ण कुटूंब पॉझिटीव्ह होण्याचे प्रमाण अधिक आहे.अशा कठीण क्षणी अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालय आणि स्व.डॉ.विमलताई मुंदडा यांनी दिलेल्या लोखंडी सावरगाव येथील रूग्णालयाच्या इमारतीत सुरू करण्यात आलेले कोविड सेंटर कोरोना रूग्णांसाठी वरदान ठरले आहे.जिल्हाभरातील रूग्णांचा ओढा या दोन्ही ठिकाणी आहे. ज्या कोराना रूग्णांची प्रकृती अत्यावस्थ होते त्यांना स्वारातीच्या कोविड अतिदक्षता विभागात दाखल करण्यात येते.वाढत्या रूग्णसंख्येमुळे स्वाराती रूग्णालयातील साधनसामुग्री अपुरी पडत आहे.ही बाब लक्षात घेऊन आ.नमिताताई मुंदडा यांनी स्वाराती रूग्णालयात कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी आमदार फंडातून एक कोटींचा निधी जाहीर केला आहे.या निधीतून 50 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स,50 बायपॅप मशीन्स, साईड रिलींगसह 20 आयसीयू बेड्स आणि 06 व्हेंटीलेटर्स देण्यात यावेत असे जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात सूचित केले आहे. आ.नमिताताई मुंदडा यांनी स्वाराती रूग्णालयातील प्रमुख डॉक्टरांशी चर्चा करून कोरोना रुग्णांसाठी कुठल्या बाबी अति प्राधान्याने गरजेच्या आहेत हे जाणून घेतले.त्यानंतर सदरील यंत्रसामुग्री पुरविणार्‍या नामांकित कंपन्यांची माहिती घेऊन उत्कृष्ट दर्जाची उपकरणे घेण्याचे निश्चित करण्यात आले.

यापूर्वी दिला 50 लाखांचा निधी

आ.नमिताताई मुंदडा यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील आमदार फंडातून 50 लाखांचा निधी कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजनांसाठी दिला होता.या निधीतून लोखंडी सावरगावच्या रूग्णालयातील ऑक्सिजन पाईनलाईनचे काम करण्यात आले होते.


सेवा करणे माझे काम-आ.मुंदडा

केज विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला त्यांची प्रतिनिधी म्हणून विश्वासाने विधानसभेत पाठविले आहे.माजी मंत्री.स्व.डॉ.विमलताई मुंदडा आणि ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी अनेक वर्षे निष्ठेने मतदारसंघातील जनतेची सेवा केली.तोच सेवेचा वारसा मला पुढे चालवायचा आहे.मला प्रतिनिधित्वाची संधी देणार्‍या मतदारसंघातील जनतेसाठी काम करणे हे माझे कर्तव्यच आहे अशी प्रतिक्रिया आ.नमिता मुंदडा यांनी व्यक्त केली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.