श्रीपती माने यांचे निधन
आष्टी : प्रतिनिधी
बीड येथील दै.झुंजार नेताचे निवासी संपादक श्रीपती माने यांचे दुःखद निधन झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.
आष्टी तालुक्यातील मातावळी येथील श्रीपती माने वय 55 वर्ष हे गेल्या आठ दिवसापासून कोरोणा बाधित होते बीड,वरुण पुणे औरंगाबाद या तिन्ही जिल्ह्यात मोठ्या दवाखान्यात उपचार घेतले माञ स्कोर जास्त आल्याने आँक्सीजन लेवल कमी झाल्याने त्याची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून कोरोनावार ते झुंज देत होते मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले
.श्रीपती माने हे बीड येथील झुंजार नेता दैनिकाचे निवासी संपादक म्हणून काम पाहत होते सर्व जिल्हाभरात त्यांची एक वेगळीच ओळख होती. गेल्या 32 वर्षांपासून ते झुंजार नेता मध्ये काम करत होते. श्रीपती माने एक ऊस तोडणी कामगार ते जिल्ह्यातील मोठ्या दैनिकाचे निवासी संपादक अशी त्यांची वाटचाल राहिलेली असून आज त्यांच्या निधनाने बीड जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांना मोठे दुःख झाले आहे श्रीपती माने यांना दैनिक लोकप्रश्न च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..
Leave a comment