माजलगाव । वार्ताहर

माजलगाव तालुक्यातील सोन्नाथडी येथील गावकर्‍यानी आ. प्रकाश दादा सोळंके यांच्याकडे मागणी केली होती त्यानुसार तालुका आरोग्य विभागाकडून फिवर स्क्रीनिंग अर्थात ताप तपासणी करण्यात आली. यावेळी माजलगाव बाजार समितीचे सभापती अशोक डक यांच्या वतीने संपूर्ण गावात डेटॉल साबणसह सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

तालुक्यातील सोन्नाथडी येथे आलेले जवळपास 38 ऊसतोड कामगार कोरंटाईन करण्यात आले होते.परंतु आरोग्य विभागाकडे गावकर्‍यांकडून करण्यात आलेल्या आ.प्रकाश सोळंके यांच्याकडे केलेल्या विनंतीनुसार सदरील क्वॉरटाइन करण्यात आलेले ऊस तोड कामगार असल्यामुळे आमची ही तपासणी करण्यात यावी.अशी मागणी करण्यात आली होती.त्यानुसार आरोग्य विभागाकडून सोन्नाथडी येथील नागरिकांची फिवर स्क्रीनिंग (ताप तपासणी) करण्यात आली.या तपासणी दरम्यान या गावचे मूळ रहिवासी असलेले बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी संपूर्ण गावात डेटॉल साबणसह सिनेटायगर चे वाटप केले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश साबळे, प्रार्थमिक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ, अनिल परदेशी,डॉ यशवंत घाडगे, डॉ.नागरगोजे डॉ.अपूर्वा बोबडे,डॉ.सुप्रिया निर्मळ,डॉ.शरयू राऊत, डॉ.गायत्री गरड,डॉ. स्नेहा राऊत, यांनी परिश्रम घेतले.यावेळी गावातील कोणाला ही कोणतीही बाधा झाली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.