केज । वार्ताहर

कौटुंबिक हिंसाचार किंवा अन्याय होत असेल आणि घराच्या इभ्रतीमुळे निमूटपणे सहन करीत असतील तर तो अन्याय सहन न करता निर्भयपणे पोलिसांना कळवावे. असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी केज येथील प्रत्येक वार्डात आणि वस्त्यात प्रत्यक्ष आपल्या फौजफाट्यासह जाऊन केले आहे.

लॉक डाऊन काळावधीत घरगुती हिंसाचार घडत असून काही ठिकाणी त्याचा उद्रेक देखील होत आहे यामुळे भांडण तंटे वाढू नयेत आणि कुणावर अन्याय अत्याचाराच्या घटना घडू नयेत म्हणून केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जनतेच्या दारी ही संकल्पना राबविली आहे. केज शहरातील नागरी वस्ती आणि प्रत्येक वार्डनिहाय स्वतः भेट देऊन आवाहन केले आहे. पो.नि.प्रदीप त्रिभुवन यांनी केज येथे ध्वनिक्षेपक वरून ही माहिती गल्लोगल्ली दिली असल्याने केज परिसरात त्यांच्या व त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे कौतुक होत आहे. तसेच यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि कुटूंबात अन्याय व हिंसाचार करणार्‍या लोकांत दहशत निर्माण झाली आहे. तर पीडितांना आधार मिळाला आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत जर असे अभिनव आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले तर कौटुंबिक हिंसाचार कमी होतील.अशा प्रकारे कुणीही घरात किंवा कुटुंबात होणारे कौटूंबिक हिंसाचार या बाबत आमच्या पोलीस अधिकार्‍यांशी संपर्क साधावा. त्यावर तात्काळ कार्यवाही केली जाईल असे पो.नि.प्रदीप त्रिभुवन यांनी सांगीतले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.