औरंगाबाद । वार्ताहर

मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान महिन्याची सुरूवात चंद्रदर्शनानंतर 25 एप्रिल पासून होणार आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत, कोरोनाचा संसर्गाचा प्रसार होऊ नये, लॉकडाऊनमधील सूचनांचे पालन व्हावे आदी विषयांबाबत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत बैठक पार पडली.

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात रमजान सणानिमित्त सर्वांगीन आढावा बैठक पार  पडली. बैठकीस खासदार इम्तियाज जलील, खासदार भागवत कराड, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, सतीश चव्हाण, प्रदीप जैस्वाल, अतुल सावे,मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील,  निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे,  पोलिस उपायुक्त मीना मकवाना, नीलेश खाटमोडे- पाटील, मनपाचे शहर अभियंता सखाराम पानझडे आदींची उपस्थिती होती.  रमजान सणानिमित्त जिल्ह्यात करावयाच्या उपाययोजना, पूर्वतयारीबाबत, लोक प्रतिनिधी व  प्रशासनातील  वरीष्ठ  अधिका-यांची आज चर्चा झाली. या चर्चेत लोक प्रतिनिधींनी आपापल्या मतदार संघातील नागरिकांची मते मांडली. तसेच लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन सर्वानुमते करण्यात येईल, असे लोकप्रतिनिधींनी बैठकीत सांगितले. यावेळी महानगर पालिकेचे आयुक्त श्री.पांडेय यांनी शहरातील क्षेत्रनिहाय आढावा घेऊन संबंधित यंत्रणेला योग्य त्या सूचनाही केल्या. शहरात विविध ठिकाणी फळ विक्रेत्यांना जागा उपलब्ध करण्याबाबत, सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, संचारबंदी काळात कुणीही विनाकारण घराबाहेर पडणार नाही, याचीही नागरिकांनी दखल घ्यायला हवी, याबाबतही चर्चा झाली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.