पैठण / नंदकिशोर मगरे
अगदी कालची घटना ताजी असतांनाच पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील कोरडे वस्ती येथील शेततळ्यात एकाच घरातील पाच जणांचा पाण्यात बुडुन मृत्यू धक्कादायक दुर्देवी घटना घडल्याने पुन्हा या घटनेने तालुका हळहळला आहे तर लक्ष्मण निवृत्ती कोरडे (वय 35) वैभव रामनाथ कोरडे (वय 12)सार्थक लक्ष्मण कोरडे (वय 7)
समर्थ ज्ञानेश्वर कोरडे (वय 7)
अलंकार रामनाथ कोरडे (वय 10) अशी मृतांची नावे आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी की , रविवार रोजी दुपारी दोनच्या सुमारास तालुक्यातील विहामांडवा येथील एकाच कुटूबातील चार मुले शेततळ्यात पोहण्यासाठी गेले असता पाण्यातून बाहेर पडत असतांना वरती बांधलेले ठिबकचा लहान असणारा पाईप तुटल्याने आतमध्ये गेलेल्या चार मुलांना बाहेर पडता न आल्याने त्या मुलाच्या चुलत्याने त्यांना वाचवण्यासाठी तळ्यात उडी मारली असता त्या मुलांनी त्याला घट्ट धरल्याने तोही त्या मुलासह पाण्यात बुडाला .बाजूच्या शेतकक-यांनी सदरिल प्रकार पहाताच आरडा ओरड केली व त्या पाचही जनांना बाहेर काढून पाचोड येथील शासकीय रूग्णालयात हलवले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषीत केले दरम्यान पाचोड पोलिसात या घटनेची आकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.