देशावर आलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी सर्व डॉक्टर आपल्या परीने सहकार्य करत आहेत त्याबद्दल सर्वांचे आभार. पण त्यातही कौतुक करावे असे माजलगावकराचेे लाडके डॉक्टर प्रकाश आनंदगावकर यांचे आज विशेष कौतुक कारणही तसेच आहे. आज सर्वसामान्य गरीब लोकांना बाहेर निघता येत नाही ज्यांचे पोट हातावर आहे त्याची आजची आर्थिक परिस्थिती खूप कमकुवत झालेली आहे. याची जाण ठेवून अशा या संकट समयी डॉक्टर प्रकाश आनंदगावकर यांनी महाराष्ट्र लॉक डाऊन झाल्यापासून एकाही ही पेशंट कडून एक रुपयाही फिस न घेता इलाज केला आहे तसे पाहिले तर अनेक वर्षापासून कोणत्या पेशंट कडे फी देण्यास पैसे नसतील तर ते फि न घेता मोफत उपचार करतात हे सर्व माजलगाव कराणा माहीतच आहे कारण रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून माणसात देव पाहून अविरत सेवा कार्य सेवाव्रत करणारे म्हणून डॉक्टर प्रकाश आनंदगावकर साहेब यांचे नाव हे सर्व माजलगाव तालुक्यातील जनता घेत असते आणि त्यामुळेच माजलगावकर देखील त्यांना देव स्वरूपी मानतात संघाच्या संस्कारातून ,प्रेरणेतून पहिल्यापासून घडल्यामुळे अखंडपणे भारत मातेच्या चरणी लीन होऊन कधी कॅप्टन म्हणून कधी डॉक्टर म्हणून कधी समाजकारणी म्हणून कधी राजकारणी म्हणून तर कधी शैक्षणिक क्षेत्रातून तर कधी शेतकरी म्हणून त्यांचे कार्य अविरत चालूच आहे आणि त्यामुळेच त्यांचे आज विशेष कौतुक करावेसे वाटते 'कार्यमग्नता जीवन व्हावे हे मृत्यूही विश्रांती ती' आपल्या कार्यामध्ये ते मग्न राहून शेवटच्या श्वासापर्यंत विश्रांती न घेता अखंडपणे जीवनभर अविरत सेवा करण्याचा त्यांनी ध्यास घेतलेला आहे हे यातून दिसते आणि म्हणूनच आजच्या वैद्यकीय आपत्ती जन्य परिस्थिती अत्यावश्यक सेवेच्या रूपातून मानवसेवेच्या आधारातून देशसेवा व यातूनच आपल्या आपल्या हातून घडणाऱ्या विश्व सेवेला मी मानवंदना करतो आणि अशा या कार्यामुळे मी डॉक्टर साहेबांचे विशेष आभार मानतो कौतुक करतो आणि कायमस्वरूपी ऋणात राहतो

*विनायक रत्नपारखी
नगरसेवक
माजलगाव जि बीड*

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.