मुंबई : -

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडियो काँन्फरसिंगद्वारे संवाद साधणार आहेत. १७ जून रोजी दुपारी ३ वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजशे टोपे, मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक एस. के. जासवाल, गृह सचिव, आरोग्य सचिव आदी उपस्थित राहणार आहेत.

देशात अनलॉक-१ सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे काही ठिकाणी शिथिलता देण्यात आली आहे. यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. देशात कोरोनाचा आकडा वाढत असताना महाराष्ट्र राज्याची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली आहे. राज्यात कोरोना संसर्गाची प्रकरणे १,०१,१४१ पर्यंत वाढली आहेत. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ३४९३ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकट्या मुंबईतच १३७२ नवीन प्रकरणांची नोंद झाली. गेल्या २४ तासांत १७१८ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ४७७९३ लोक या साथीने बरे झाले आहेत.

 कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत ११ हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.  देशात कोरोनाव्हायरसच्या संसर्गाची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. शनिवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोना संसर्गाची ३,०८,९९३ प्रकरणे नोंदली गेली आहेत. दरम्यान, एक गोष्ट चांगली आहे की, १५४३३०रुग्ण बरे झाले आहेत आणि  ते घरी गेले आहेत. परंतु दुःखाची बाब म्हणजे आतापर्यंत ८८८४ लोकांचे बळी गेले आहेत.

गेल्या २४ तासात ११४५८ नवीन रुग्ण सापडले आहेत. यात ३८६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच बरे होण्याचे प्रमाण ४९.९४ टक्के आहे. जून महिन्यापासून संक्रमण खूप वेगाने पसरले आहे. याचा अंदाज लावला तर कोरोना इन्फेक्शनची संख्या अधिक वाढेल. १ जूनपासून आतापर्यंत ३००० हून अधिक लोक मरण पावले आहेत. ही आकडेवारी केवळ धक्कादायकच नाही तर धडकी भरवणारी आहे. या नव्या आकडेवाडीवरुन असे दिसून येते की लोक  सोशल डिस्टेंसिंग गंभीरपणे पालन करीत नाहीत. यामुळे, कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. हे असेच होत राहिले तर जून महिन्याच्या अखेरीस देशात संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत हा आकडा १० लाखांच्या पुढे जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.