डोंगरकिन्ही । वार्ताहर
आपल्या हक्काच्या मागणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन असताना सुद्धा कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या मोहिमेत पहिल्या पासून संगणकपरिचालक ग्रामीण भागात असेल ते काम करतच आहेत. यात जीवाची जोखीम सर्वाधिक आहे. त्यामुळे राज्य संघटनेच्या वतीने ग्रामविकासमंत्री मा.मुश्रीफ साहेबांना निवेदन दिले. त्या निवेदनात संगणकपरिचालकासोबतच ग्रामसेवकांच्या जीवाचा विचार करून त्यांना सुद्धा विमा कवच देण्याची मागणी केली होती. आपल्या सोबत त्यांना सुद्धा 25 लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य संगणकपरीचालक संगठनेचे राज्य अध्यक्ष सिद्धेश्‍वर मुंडे यांनी दिली आहे.
राज्यातील एकमेव संघटना आहे की मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहून सांगितले की आम्ही सध्या गाव पातळीवर तर सक्रिय राहून काम करतच आहेत पण शासनाला या कोरोनाचा मोहिमेत आणखी कुठले काम द्यायचे असेल तर आम्ही देशसेवा म्हणून काम करण्यास तयार आहेत. मध्ये शासनाने निर्णय घेतला त्यात ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मतदनिस यांना 25 लाख रुपयांचे विमाकवच दिले त्याबद्दल त्या निर्णयाचे आपण स्वागतच केले पण या सर्वांबरोबर ग्रामपंचायत स्तरावर जीवाची जोखीम घेऊन काम करणार्‍या संगणकपरिचालकांच्या त्यात समावेश नव्हता. निवेदन दिल्यानंतर याबाबत राज्याचे ग्रामविकासमंत्री हसनजी मुश्रीफ यांच्यासोबत फोन वरून सविस्तर बोलणे झाले होते. ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर व अंगणवाडी सेविका, मदतनिस यांना विमा कवच दिले त्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन सुद्धा केले पण संगणकपरिचालक हे सुद्धा जीवाची पर्वा न करता काम करत आहेत मग त्यांना विमा कवच का दिले नाही यावर 8 एप्रिल रोजी शासनाने निर्णय घेऊन 25 लाख रुपयांचे विमा कवच लागू केले व आपल्या संगणकपरिचालक व ग्रामसेवकांचा सन्मान म्हणून 31 मार्च 2020 रोजी काडलेल्या पत्रातील 12 व्या व 14 व्या ओळीच्या पुढे उल्लेख केला की आपण ग्रामपंचायत स्तरावर लोकांमध्ये जनजागृती, स्वच्छता मोहीम राबविणे, आरोग्याची काळजी घेणे इत्यादी कामे अहोरात्र मेहनत घेऊन जीवाची पर्वा न करता करत आहेत असे वाचण्यात यावे असे आजच्या पत्रात नमूद केले आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य संगणक परीचालक संगठणेच अध्यक्ष सिद्धेश्‍वर मुंडे यांनी दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.