पत्रकार हमीद पठाण, पत्रकार दयानंद सोनवणे यांनी केली घरपोहच मदत
डोंगरकीन्ही । वार्ताहर
संपुर्ण जगात कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले. त्यातच पाटोदा तालुक्यात बांधकाम मजुरांवर उपासमारीची वेळ आली. पाटोदा येथील हमीदखान याची जिल्हाधिकारी यांना केलेल्या विनंतीची बातमी दै.वर्तमानपत्रात उपासमारीची दि.2 एप्रिलाला प्रसिध्द केली. ती समाजमाध्यमावर गेली व ती दिल्लीस्थित व पाटोदा येथिल भुमिपुत्र संतोष दगडु नारायण कर यांनी वाचली व पाटोद्यात मदत पाठवली.
पाटोदा येथिल भुमीपुत्र संतोष दगडु नारायणकर हे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचे दिल्ली येथिल पी ए असुन त्यांचा अनेक सामाजिक कामात सहभाग असतो. बांधकाम मजुरांच्या उपासमारीची बातमी समाजमाध्यमावर पहाताच वर्गमित्र हमीद खान पठाण यांना फोनवर चर्चा करुन मदतीचे आश्‍वासन देऊन तात्काळ पन्नास किराणा किटची रक्कम पाठवली. संतोष नारायणकर यांना मजुरांची अवस्थेची जाणिव आहे. कारण त्यांनीही मजुरीच्या झळा सोसल्या आहेत. त्याचीच उतराई म्हणुन पाटोदा तालुक्यातील पन्नास गरजु, विधवा, परितक्तामहिला,व बांधकाम मजुरांना एक महिण्याचे किराणा किट देऊन या लॉकडाऊन मध्ये मदत केली. लॉकडाऊनमुळे इमारत कामगार संकटात सापडलेल्या आहे. या कारणाने स्वराज्य वास्तुसेवा सहकारी संस्थाचे अध्यक्ष पत्रकार हमीदखान यांनी जिल्हाधिकारी यांना प्रसिध्दी पत्रकाध्दारे इमारत कामगारांना दोन वेळेस अन्न द्या म्हणून मागणी केली. ही बातमी पाटोद्याचे भुमीपुत्र संतोष दगडु नारायणकर व त्यांच्या सौभाग्यवती पत्नी यांच्या समाज माध्यमातून लक्षात येताच हमीदखान पठाण यांना दिल्लीवरुन फोन करून या गोरगरीबांची यादी मागीतली व बँक खाते मागवुन घेऊन तात्काळ पन्नास किटची रक्कम पाठवली. पत्रकार हमीद पठाण हे या मदतीचे माध्यम होऊन. पत्रकार दयानंद सोनवणे, हमीद पठाण, पत्रकार संजय सानप यांच्या हस्ते ही मदत गरजुंच्या घरापर्यंत घरीपोहच केले. संतोष नारायणकर माजी केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचे जवळचे नातेवाईक जातात. तसेच स्वर्गीय शाहुराव जाधव (पाटील) यांच्या नंतर एकमेव संतोष दगडु नारायणकर हे दिल्ली येथिल कोणत्याही कामासाठी पाटोदा तालुक्यातील नागरीकांच्या कामी येतच असतात. हलाखीच्या परिस्थीतीत कमी शिक्षण असुनही दिल्ली येथे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या माध्यमातुन दिल्लीत स्थिरस्थावर झाले. तरीही भुमीची उतराई होतात. बांधकाम मजुरांची व इतर मजुराची परिस्थीती बातमीत छापली म्हणुनच मी मदत देऊ शकलो याचे सर्व श्रेय माझे मित्र हमीद पठाण यांनाच देतो असे संतोष नारायणकर यांनी बोलताना सांगितले.पाटोदा शहरातुन अनेक स्थलांतरीत झाले, सक्षम झाले. संतोष नारायणकर हे जन्मभुमीला विसरले नाहीत. हीच मदत नाही तर दिल्लीत गेल्यावर किँवा दिल्लीच्या आसपास कोणतीही मदत लागल्यास ते तात्काळ धाऊन येतात. केंद्रातील अनेक योजना पाटोदा व आष्टी येथे आणण्यास त्यांचा सिंहाचा वाटा आहे असे सय्यद शफीक अहेमद म्हणाले.
----

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.