बीड । वार्ताहर

संकटाच्या काळी धावून जाणं हा काही जणांचा स्थायी स्वभाव असतो. बीडमध्ये संकटकाळी मदत करणारे दातृत्व असलेले अनेक हात आहेत. परंतू त्या सर्वांमध्ये राजयोग फाऊंडेशनचे दिलीप धुत आणि त्यांचे चिरंजीव नगरसेवक शुभम धुत यांचे कार्य अपेक्षांच्या आणि शुभेच्छांचा डोंगर उभा करणारे ठरले आहे. रामनवमी ते रमजान या दरम्यान त्यांनी अनेक निराधारांना आधार दिला. भुकेल्या पोटांना अन्न दिले, तहानलेल्यांना पाणी दिले. केवळ मित्रांच्या सहकार्याने नगरसेवक शुभम धुत यांनी हजारो कुटुंबांना निस्वार्थपणे केलेली मदत भविष्यांसाठी अपेक्षांचा आणि आर्शिवादांचा वर्षाव करणारी ठरणारी आहे. राजयोग फाऊंडेशनच्या माध्यमातून कोरोनासारख्या संकटात पर्यटन महाविकास मंडळाचे माजी सदस्य दिलीप धुत यांच्या संकल्पनेतुन हे मदत कार्य उभा राहिले. केवळ संकटात नव्हे तर एरव्हीही गरजुंना मदत करणे हा त्यांचा धर्मच राहिला आहे.

बीड शहरापुरतेच मर्यादित न राहता, बीड तालुकाच नाही तर पाडळशिंगीच्या टोल पासून, जिल्ह्याच्या सीमेवरील चौसाळा चेक पोस्टपर्यंत व शिरुर तालुक्यातील ब्रम्हनाथ येळंब ते पिंपळनेर, व घाटसावळी च्या परिसरा पर्यंत ग्रामीण भागातील गरजुंना ही शक्य ती मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राजयोगफाउंडेशन च्या माध्यमातून करण्यात आला. रामनवमी ला प्रभाग सॅनिटायझ करण्यापासुन रमजान ईदचे शिरखुर्म्याचे साहित्य देण्यापर्यन्त अविरतपणे कार्य सुरुच ठेवले.

या कालावधीत त्यांनी सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न केला, काहींना मदत होवू शकली नाही अनेकांनी या उपक्रमाचे सोशल मिडियावर आणि प्रत्यक्ष संपर्क करून कौतुक केले आणि मार्गदर्शनही केले. त्यामुळे शुभम धुत यांनी अधिक जोमाने काम केले.सतत मदत करण्यासाठी ते स्वतः शहरातील भागासह, विविध आश्रम व ग्रामीण भागातील गाव, पाल, विविध वस्त्यांवर जाऊन साहित्य देण्याबरोबरच गरजूंच्या आरोग्यची काळजी घेत त्यांना सोशल डिस्टंसींग चे महत्त्व सांगत अनेक ठिकाणी आवश्यकतेनुसार मास्क, सॅनिटायझयर ही दिले. 

यादरम्यान 3000 कुटुंबांना अन्न-धान्य व किराणा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले, व शेवट आपल्या मुस्लिम बांधवांच्या गरजु निराधार 300 पेक्षा जास्त श्रमिक कुटुंबांना ईद साजरी करण्यासाठी शिरखुर्म्याचे साहित्य देऊन झाला. 

इन्फट आश्रम, आदीवासी समीकरण, सेवाश्रम, सर्पराज्ञी प्रकल्प, कामधेनु आरोग्यधाम, हत्तीखाना, कृष्ण मंदिर येथील महानुभाव पंथ आश्रम, शांतीवन सह अन्य काही कम्युनिटी किचन्स, एकल महीला संघटना - निराधार विधवा महिला, बीड शहरातील सर्व स्मशानभूमी, कब्रस्तान, वाणी समाजातील स्मशानभूमी, चर्च व ग्रेवयार्ड याठिकाणांची देखभाल व खोदकाम करणारे कुटुंबांसह, शहरातील वासुदेव समाजातील कुटूंब, नाभिक समाजातील कामगार, भटक्या विमुक्त मदारी समाजातील गरजु, घरकाम करणार्‍या महीला, परिट समाजातील गरजु, लोहार समाजातील गरजु, इलेक्ट्रॉनिक माध्यमातील श्रमीक कामगार, मुस्लिम निराधार विधवा महिला, सायकल रिक्षा चालक, ऑटो रिक्षा चालक, सर्पमित्र, निराधार अपंग, सुतार समाजातील गरजु, ढोल-ताशा, हलगी वादक, यासह शहरातील असंख्य गरजु कुटुंबांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील गरजु, अपंग, निराधार, शेतमजुर व गावाबाहेर क्वारंटाईन  केलेल्या उसतोड मजुरांना ही अन्नधान्य व किराणा साहित्य उपलब्ध करून दिले. यामधे म्हाळसापुर, तिप्पटवाडी, घाटजवळा, रुईलिंबा, उमरद जहागीर, जुजगव्हाण, पिंपळनेर, घोडका राजुरी, अंथरवण पिंपरी, काकडहिरा, खांडेपारगाव, वरवटी, ब्रम्हनाथ येळंब, लोळदगाव, जरुड, केसापुरी, काठोडा, बेलूरा, आर्वी, मौजवाडी, राक्षसभुवन देवीचे, पेंडगाव, कामखेडा, बहीरवाडी, सिरसमार्ग, शिरापुर, मांजरसुंबा, मांडवजाळी व उमरी येथील आदिवासी भिल्ल वस्ती, गोरे वस्ती व इतर गावांचा समावेश आहे.

या सह 21 मे ला प्रथमच बीड शहरात कोरोना चे 3 रुग्ण आढळले जे मुंबईहुन आलेले होते, आणि शहरातील तो भाग कंटनमेंट झोन जाहीर करण्यात आला. या परिसरात स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणारे स्वच्छता कर्मचारी यांना नगरसेवक म्हणुन नाही तर एक एक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य समजून मेडिकल ग्लोज, सॅनिटायझयर, मास्क व यासह अन्नधान्य व किराणा साहित्य ही उप्लब्ध करुन दिले.

 त्यांच्या या मदतीच्या महायज्ञामध्ये जवळपास 2 महिने अविरतपणे सुरु असलेल्या या कार्यात राजयोग फाऊंडेशन चे विजय लाहोटी, सत्यनारायण करवा, अशोक करवा, गिरीष मुंदडा, सुमीत तोष्णीवाल, शैलेश नाईकवाडे, समीर सय्यद, अजय नाईकवाडे, वैभव जाधव, सागर वाहुळ, अभिनंदन सारडा, ऋषभ वाघमारे, अतिष अंधारे, अभिजीत आव्हाड, प्रशांत डोरले, अजिंक्य पवळ, सद्दाम शेख, काशिफ चाऊस, संकेत चरखा, राजदिप धुत, पुष्कर मुंदडा, संकेत करवा, मेघराज जगदाळे, सुशांत राऊत, निखील बोंडगे, स्वराज कुडके, विलास दातखीळ, सय्यद ताहेर व इतर सहभागी होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.