बीड । वार्ताहर
जागतिक महामारी असलेल्या कोरोनाशी मुकाबला करणारे पोलिस बांधव, डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांचे आरोग्य चांगले रहावे, त्यांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी वनश्री पुरस्कार विजेते शेतकरी सखाराम शिंदे मोफत मोसंबी वाटत आहेत. राजकीय नेत्यांनी या शेतकर्‍याचा आदर्श घेऊन कोरोनाशी लढणार्‍या डॉक्टर, पोलिसांना मोसंबी, संत्री, लिंबू अशी सी जीवसत्व असेली फळे मोफत वाटण्याची गरज आहे.
चिनच्या हुवान प्रांतात सुरू झालेली कोरोना विषाणुची साथ जगातील 190 देशांत जाऊन पोचली आहे. जगभरात दहा लाखाहून अधिक लोकांना या आजाराची लागण झाली असून 70 हजारापेक्षा अधिक लोकांचा या विषानुने बळी घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक महामारी म्हणून घोषीत केलेल्या या आजाराला रोखण्यासाठी एकमेकांपासून दुर राहणे आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवणे हा एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट झाले आहे. संपुर्ण देश लॉकडाऊन केल्यामुळे रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी झाली असली तरी रूग्णांची संख्या मात्र झपाट्याने वाढत आहे. या परिस्थितीत कोरोनाचे रूग्ण आणि संशयीत लोकांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी तसेच रस्त्यावर उभा राहून काम करणारे पोलिस बांधव यांची प्रतिकारशक्ती वाढावी, कोरोनाच्या विषाणूचा मुकाबला करणारी शरीरातील यंत्रणा सक्षम रहावी या हेतून शिवणी ता. बीड येथील शेतकरी सखाराम शिंदे हे आलप्या शेतातील मोसंबी बीड येथे आणून पोलिस आणि आरोग्य कर्मचारी यांना मोफत वाटत आहेत. महाराष्ट्र सरकारने वनश्री म्हणून गौरवीलेल्या या शेतकर्‍याचा आदर्श सामाजिक कार्यकर्ते, दानशूर उद्योजक, व्यापारी आणि राजकारणी मंडळींनी घेण्याची गरज आहे. कारण आज कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका पोलिस, नर्स, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना आहे. त्यांची ह्यूम्यानिटी पावर आणि रोग प्रतिकार शक्ती चांगली रहावी यासाठी सी जीवनसत्व असलेली लिंबू वर्गीय फळे (मोसंबी, संत्री) त्यांना मोफत वाटली तर त्यांचे शरीर कोरोणाच्या विषाणूशी लढण्यासाठी अधिक सक्षम बनणार आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकर्‍यांनी पाण्याप्रमाणे घाम गाळून मोसंबी, संत्री या फळबागा जोपासल्या त्या शेतकर्‍यांना चार पैसेही मिळतील. यामुळे आरोग्य कर्मचारी आणि पोलिस बांधवांसाठी ईतर काही उपक्रम राबवण्याऐवजी संत्री, मोसंबी त्यांना मोफत देणे हा उपक्रम फायद्याचा ठरणार आहे.
लोकप्रतिनिधींनी पुढे यावे- सखाराम शिंदे
कोरोना या घातक आजाराशी लढत असताना पोलिस बांधव आणि वैद्यकिय क्षेत्राशी निगडीत लोकांची प्रतिकारशक्ती प्रबळ राहाणे गरजेचे आहे. कारण त्यांनाच कोरोनाच्या विषाणुचा सर्वाधिक धोका आहे. पोलिस, नर्स, डॉक्टर यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवी यासाठी माझ्या शेतातील ताज्या मोसंब्या बीड येथे आणून मी मोफत वाटत आहे. राजकीय नेते, उद्योगपती आणि लोकप्रतिनिधींनी पुुढे येऊन ईतर काही करण्याऐवजी पोलिस, नर्स, डॉक्टर यांना मोफत मोसंबी वाटप करावे. यामुळे त्यांचा कोरोनाचा धोका तर कमी होईलच मात्र शेतकर्‍यांनाही चार पैसे मिळतील असे वनश्री पुरस्कार विजेचे शेतकरी सखाराम शिंदे माध्यमाशी बोलताना सांगीतले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.