पोलिस प्रशासन, महसुल प्रशासन झोपेतच!

बीड । वार्ताहर

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे कोरोनामुक्त व्हावेत यासाठी दोन दिवसापुर्वी पैठण येथे सिध्देश्‍वर महादेव मंदिरामध्ये काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा शिवाजी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र काळे यांनी पंचदिनी रूद्र अभिषेकास सुरूवात केली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभुमीवर राज्यभरामध्ये आपत्ती निवारान कायदा लागू झाल्याने सर्व मंदिरे बंद असतांना अभिषेक कसा केला जातो? पैठण येथील पोलिस प्रशासन, महसुल प्रशासन झोपले आहे काय? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थितीत केला जात आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोना लागण झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबई येथील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. या आजारातुन त्यांची सुटका व्हावी म्हणून पैठणमध्ये त्यांचे समर्थक प्रदेश काँग्रेसचे सचिव रविंद्र काळे यांनी शहरातील प्राचिन अशा सिध्देश्‍वर महादेव मंदिरात पंचदिनी रूद्र एकादशनी अभिषेकास प्रारंभ केला असून या अभिषेक पाच दिवस सुरू राहणार असल्याचे रविंद्र काळे यांनी सांगितले. हा अभिषेक चालू असतांना सोशल डिस्टंन्स पाळले गेले नाही. विशेष म्हणजे कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभुमीवर राज्याभरातील सर्व मंदिरे बंद असतांना पैठणचे सिध्देश्‍वर मंदिर उघडलेच कसे? आणि याची माहिती येथील पोलिस प्रशासनाला अथवा महसुल प्रशासानाला नव्हती काय? असाही प्रश्‍न उपस्थितीत केला जात आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.