गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने परळीत गरजूंना घरपोंच रेशन

परळी । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणा-या गोरगरीब, कष्टकरी गरजू नागरिकांच्या मदतीसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पंकजाताई मुंडे धावून आल्या असून ‘घार उडे आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी’ चा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. त्यांच्या सूचनेवरून कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठानच्या वतीने भाजपाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून गरजू रहिवाशांना रेशन व किराणा साहित्याचे आज घरपोंच वाटप केले. ऐन संकटकाळात नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे, हातावर पोट असणारे, रोजंदारी, कष्टकरी कामगार व गोरगरीब जनता यामुळे मोठ्या अडचणीत सापडली आहे, त्यांचा रोजगार बंद झाला आहे. अशा कठीण प्रसंगात पंकजाताई मुंडे यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली आहे, कोरोनाग्रस्तांसाठी त्यांनी कांही दिवसांपूर्वी पंतप्रधान सहायता निधीला 25 लाखाचे योगदान दिले आहे, याही वेळेला त्या धावून आल्या आहेत. गोरगरीब, कष्टकरी वर्गाला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने आज घरपोंच रेशन तसेच किराणा साहित्य वाटप केले. भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, नगरसेवक पवन मुंडे, राजेंद्र ओझा, योगेश पांडकर व कार्यकर्त्यांनी राजीव गांधी नगरातील झोपडपट्टीत जाऊन गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे किट ज्यात 3 किलो गव्हाचे पीठ, 2 किलो तांदूळ, तुर दाळ, साखर, गोडतेल, चना, मीठ पुडा, मिरची व हळद पावडर, साबण आदी साहित्य वाटप केले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने यापूर्वीही गोरगरीबांना मदत, ऊसतोड मजूरांच्या पाल्यांना शैक्षणिक सहकार्य, सामुदायिक विवाह सोहळा, आरोग्य शिबीर, वैद्यकीय मदत आदीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. गोपीनाथ प्रतिष्ठानने केलेल्या या मदतीबद्दल कष्टकरी व मोलमजुरी करणा-या घटकांनी समाधान व्यक्त केले असून घरपोंच रेशन मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसून आला.
मला तुमची चिंता, काळजी घ्या..
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे दोन घास असे सांगत पंकजाताई मुंडे यांनी नागरिकांना मी तुमची लेक मुंबईतील अत्यंत धोक्याच्या भागात अडकले आहे. पण जसं घार उडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी तसं माझं लक्ष तुमच्याकडे आहे. मला तुमची चिंता आहे काळजी घ्या असे आवाहन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.