पुणे: शहरातील ससून रुग्णालयात आज आणखी तिघांचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला. तिघांचे वय हे साठ वर्षांपेक्षा अधिक होते. त्यापैकी दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. पुण्यातील मृतांची संख्या आता आठवर पोहोचली. या तिघांचा आज, मंगळवारी सकाळी ९ ते ११ दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळते.

पुण्यात आज तिघांचा मृत्यू झाला आहे. या तिघांनाही करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना इतर आजारही होते. आता पुण्यातील मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

औरंगाबादेत तिघांना करोना

औरंगाबाद शहरात आणखी तिघे करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये घाटीमध्ये रविवारी मृत झालेल्या करोनाबाधित ५८ वर्षीय बँक अधिकाऱ्याचा ३० वर्षीय मुलगा व २८ वर्षीय सून आणि करोनाबाधित महिलेच्या १७ वर्षीय मुलीचा समावेश आहे. तिघे सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल आहेत. आता औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १४ इतकी झाली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.