बीड,परळी,माजलगावमधील चित्र
सोशल डिस्टंन्टींगची मर्यादा भंग

बीड । वार्ताहर
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन सातत्याने नवनवीन उपाययोजना करत आहेत. विनाकारण घराबाहेर पडू नका. जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी घरातील एकाच सदस्याने बाहेर यावे.असे सारे आवाहन प्रशासनाने केलेले असतांनाही आज मंगळवारी (दि.7) सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीत संचारबंदी शिथील झाल्यानंतर खरेदीसाठी नागरिक चक्क दुचाकी आणि चार चाकी वाहने घेवून खरेदीसाठी घराबाहेर पडले. त्यामुळे मागील 12 दिवसात कधी झाली नाही इतकी गर्दी आज पहिल्यांदाच शहरात दिसुन आली. दरम्यान आज बीडसह माजलगाव, अंबाजोगाई व परळी या चार नगर पालिका हद्दीत याच वेळेत संचारबंदी शिथील झाली होती. या शहरातही असेच चित्र दिसुन आल्याचे आमच्या वार्ताहरांनी सांगितले.

संचारबंदी शिथील करण्याच्या वेळेत आज मंगळवारपासून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशावरुन बदल करण्यात आला आहे. त्यानुसार दि.7, 9, 11, 13 या तारखेला बीड, माजलगाव, अंबाजोगाई व परळी या चार नगर पालिका हद्दीत संचारबंदी शिथलीकरणाची वेळ सकाळी 7 ते 9.30 ऐवजी सकाळी 11 ते दुपारी 3 अशी करण्यात आली आहे. साहजिकच अडीच तासांऐवजी चार तास संचारबंदी शिथील झाल्याने नागरिक खरेदीचे निमित्त करुन मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याचे चित्र दिसुन आले. दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळुन सर्वसामान्य नागरिकांना इंधन पुरवठा करु नये असे आदेश जिल्हाधिकारी यांनी यापूर्वीच दिलेले आहेत.

मंगळवारचे चित्र पाहिले तर बीडमध्ये पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहन चालकांच्या रांगा लागल्या होत्या. हेच चित्र शहरातील ठिकठिकाणच्या भाजीपाला आणि किराणा दुकानातही दिसुन येत होते. वास्तविक पोलीसांना याबाबत माहिती मिळताच शहरातील विविध भागात धाव घेत गर्दी पांगवण्यासाठी उपाय योजना हाती घेतल्या. काही दुचाकी, चारचाकी वाहनेही ताब्यात घेतली. पोलीस रस्त्यावर उतरल्याचे पाहून गर्दी करणारे लोक घराकडे निघुन गेले. प्रशासन जनतेसाठीच काम करत आहे. त्यांना प्रत्येकाने सहकार्य करण्याचे गरज आहे. नागरिकच सोशल डिस्टंन्टींगची मर्यादा भंग करणार असतील तर कोरोनाचा मुकाबला आपण कसा करु असा साधा विचार प्रत्येकाने करणे गरजेचेे होवून बसले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.