नांदेड: दिल्लीतील निजामुद्दीन येथे धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर नगर आणि नांदेडमधील मशिदीत लपून राहिलेल्या ४५ तबलिगींविरोधात गुन्हे दाखल करण्यता आले आहेत. या सर्वांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांना क्वॉरंटाइन करण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
नांदेड पोलिसांनी रविवारी १० इंडोनेशियन नागरिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे दहाही जण तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यातील दोनजण नांदेडमधील रहिवासी असून हे दोघेही या इंडोनेशियन नागरिकांसोबत दिल्लीच्या या कार्यक्रमात उपस्थित राहिले होते.
हे सर्व लोक १५ मार्च रोजी नांदेडला पोहोचले होते आणि इथल्या एका मशिदीमध्ये थांबले होते. त्यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली नव्हती. आता त्यांना नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. आम्ही त्यांचे स्वॅबही तपासणीसाठी पाठवले आहेत, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
Leave a comment