परस्परविरोधी तक्रारी;15 जणांवर गुन्हा
दिंद्रुड । वार्ताहर
जुन्या भांडणाची कुरापत काढून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. लाठ्या-काठ्यांसह डोळ्यात चटणी टाकून मारहाण केली गेली. माजलगाव तालुक्यातील मोगरा गावानजिकच्या माळतांड्यावर गुरुवार व शुक्रवारी दोन वेळेस हा वाद झाला. परस्परविरोधी तक्रारीवरुन दोन्ही गटातील 15 जणांवर दिद्रुंड ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
गोरख खेमा चव्हाण (38) यांनी गुरुवारी दिंद्रुड ठाण्यात तक्रार नोंदवली. पुतण्या राहुल बाबासाहेब चव्हाण यास आरोपी रोहिदास पवारच्या मुलीला बोलल्याच्या कारणावरुन काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. यावरुन पंडीत शिवाजी पवार, रोहिदास शिवाजी पवार, दत्ता परशुराम पवार, सुनील पवार, अनिल सोनेराव पवार, बाळू सुखदेव पवार, भारत नामदेव पवार व विजय रामेश्‍वर पवार (सर्व रा.माळतांडा तहत मोगरा) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला.
दुसर्‍या गटातील रोहिदास शिवाजी पवार (35) यांनीही शुक्रवारी तक्रार नोंदवली. आरोपी बाबासाहेब चव्हाणचा मुलगा राहुलला मारहाण केल्याचा बदला घेण्यासाठी अंगावर चटणी टाकून दगडफेक करत काठ्यांसह लाथाबुक्याने मारहाण करत इजा पोहचवली. जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. यावरुन सुंदर खेमा चव्हाण, बाबासाहेब खेमा चव्हाण, गोरख खेमा चव्हाण, संतोष साहेबराव चव्हाण, राजेभाऊ रामा चव्हाण, प्रकाश रामा चव्हाण, नितीन रंगनाथ चव्हाण ( सर्व.रा.माळतांडा) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.