बीड (प्रतिनिधी) श्रीक्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती न्यायाचार्य ह.भ.प. डॉ.नामदेवशास्त्री महाराज यांचे मन मंदिरा- गजर भक्तीचा झी टॉकीज या वाहिनीवर आज दि. 6 ते दि. 18 एप्रिल 2020 या कालावधीत सायंकाळी 6 ते 7 वाजता ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण हा कार्यक्रम होणार आहे. बीड येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात या भावकथेचे आयोजन केले गेले होते.

डॉ.नामदेवशास्त्री महाराज यांचे ज्ञानेश्वरीवर चिंतनपर लेख आणि आध्यात्मावर विविध लेख प्रसिध्द झाले आहेत. ज्ञानेश्वरी चिंतन हा त्यांचा ग्रंथ अभ्यासकांना मार्गदर्शक आहे. बीड येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात या भावकथेचे आयोजन केले गेले होते. याच ज्ञानेश्वरी भावकथेचे झी टॉकीज वाहिनीवर पहिल्यांदा ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण कार्यक्रम होणार असून ज्ञानेश्वरी अभ्यासक व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन खटोड प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.