बीड । वार्ताहर

मरकज मशीद निजामुद्दीन दिल्ली येथील घटनेनंतर समाज माध्यमावरुन व्हॉटसअप गु्रपवर विविध प्रकारचे सांप्रदायिक भडकावू संदेश प्रसारित होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर बीड जिल्ह्यात सांप्रदायिक घटना घडू नयेत व कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी शनिवारी (दि.4) नवीन आदेश लागू केले आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, बीड जिल्ह्यातील व्हॉटसअ‍ॅप ग्रुप मेंबरला आता मेसेज पाठवता येणार नाहीत. केवळ गु्रप अ‍ॅडमीनच संदेश पाठवू शकतील. यानंतर जर कोणी व्हाटसअप गु्रपवर असा कोणताही संदेश ज्यामुळे समाजामध्ये, धर्मांमध्ये तेढ निर्माण होवू शकेल असे संदेश प्रसारित केले गेले तर अशा व्हाटसअप गु्रपचे अ‍ॅडमिन गुन्ह्यास पात्र ठरतील. दरम्यान हे आदेश पुर्णपणे प्रशासकीय कामकाजाकरिता वापरल्या जाणार्‍या व्हाटसअप गु्रपला लागू राहणार नाहीत असेही जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.