बीडमधून पवारांचा पुन्हा बजरंग सोनवणेंवरच डाव; ज्योती मेंटेचा पत्ता कट

बीड लोकसभा निवडणुकीचं गणित बदलणार?

बीड | वार्ताहर

बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी ज्योती मेटे आणि बजरंग सोनावणे हे दोघेजण इच्छूक होते. मात्र, बजरंग सोनावणे यांनी गेल्या निवडणुकीत प्रीतम मुंडे यांना चांगली टक्कर दिली होती. ज्योती मेटे यांच्यापेक्षा बजरंग सोनावणे यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी असलेली यंत्रणा आणि क्षमता हे निकष लक्षात घेता शरद पवार गटाने बजरंग सोनावणे यांना बीडमधून उमेदवारी देऊ केली आहे.  बीडमध्ये आता पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी लढत रंगेल ,यापूर्वी शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुख ज्योती मेटे यांनी उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी त्यांचं तिकीट कापल्याची चर्चा आहे. दरम्यान, बजरंग सोनवणे यांचं नाव घोषित झाल्याने ज्योती मेटे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

त्यातही त्यांनी बीडमध्ये आपला जुनाच डाव खेळला. बजरंग सोनवणे यांना अजित पवारांकडून खेचून घेऊन त्यांच्याच गळ्यात बीडची उमेदवारी घातली. त्यामुळे पवारांना भेटून गेलेल्या ज्योती मेटे यांचा पत्ता परस्पर कट झाला.  बजरंग सोनवणे यांची आता पंकजा मुंडे यांच्या विरोधात लढत होणार आहे. एकीकडे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे एकत्रित बळ, तर दुसरीकडे फुटलेल्या राष्ट्रवादीची उमेदवारी अशी ही लढत असणार आहे.

बजरंग सोनवणे यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची पहिलीच वेळ नाही. 2019 मध्ये त्यांनी प्रीतम मुंडे यांच्या विरोधात बीडमधूनच निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असून देखील मोदी लाटेत बजरंग सोनवणे यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्यानंतर सुरुवातीला बजरंग सोनवणे अजित पवारांच्या गटात गेले, पण तिथून बीडची उमेदवारी मिळणार नाही कारण तो मतदारसंघ अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुटणारच नाही हे लक्षात येताच बजरंग सोनवणे यांनी शरद पवारांच्या पक्षात उडी मारली.

 

पण त्यांच्या उमेदवारीत ज्योती मेटे यांच्या भेटीगाठीतून अडथळा निर्माण झाला. ज्योती मेटे कालच शरद पवारांना भेटल्या होत्या. त्यांनी बीडमधून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. पवारांनी त्यांना “बघू” एवढेच उत्तर दिले होते. त्यामुळे ज्योती मेटे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापासून पाऊल मागे घेतले होते. पवारांनी आज बजरंग सोनवणे यांच्यावरच “जुना डाव” खेळत बीडमधून त्यांची उमेदवारी जाहीर केल्याने ज्योती मेटे यांचा पत्ता परस्पर कट झाला. आता त्या वंचित बहुजन आघाडी कडून निवडणूक लढवतात का??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ज्योती मेटे अपक्ष निवडणूक लढणार?

महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांना बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे अपक्ष उमेदवारी लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. दोन दिवसानंतर कार्यकर्त्यांशी भेट घेऊन लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भातील अधिकृत भूमिका स्पष्ट करणार अशी माहिती ज्योती मेटे यांनी बोलताना दिली. महाविकास आघाडीकडून ज्योती मेटे यांच्या नावाची होती. शरद पवारांसोबत बैठकाही झाल्या होत्या. शेवटी मी लोकसभा निवडणूक लढावी ही लोकांची आणि शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. स्वर्गीय लोकनेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर मराठा चेहरा म्हणून ज्योती मेटे अपक्ष परिणाम कारक ठरू शकतील, असं जाणकारांचे मत आहे.

 

बीडमध्ये तिरंगी लढत?

शरद पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे आता ज्योती मेटे या बीडमधून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे. ज्योती मेटे यांनी याआधी प्रतिक्रिया देताना आपलं पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरु असल्याचं म्हटलं होतं. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर आपण पुढचा निर्णय घेऊ, असंही त्या म्हणाल्या होत्या. शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळेल, अशी ज्योती मेटे यांना आशा होती. पण त्यांना उमेदवारी मिळालेली नाही. त्यामुळे आता ज्योती मेटे या अपक्ष लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ज्योती मेटे या अपक्ष लढल्या तर बीडमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. ज्योती मेटे या शिवसंग्रामचे दिवंगत प्रमुख विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत. बीडमध्ये त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी ज्योती मेटे यांचं मोठं चॅलेंज असण्याची शक्यता आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.