लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आलेल्या विनायक मेटे  यांच्या पत्नी ज्योती मेटे  यांनी अखेर लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ज्योती मेटे यांनी शासकीय नोकरीचा राजीनामा दिला असून, लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची अधिकृत भूमिका त्यांनी आज स्पष्ट केली आहे. तसेच याबाबत आपण लवकरच आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं देखील ज्योती मेटे यांनी म्हटले आहे. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून  पंकजा मुंडे  विरुद्ध ज्योती मेटे असाच सामना रंगणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे


महविकास आघाडीच्या माध्यमातून बीड लोकसभा निवडणुकीसाठी ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, ज्योती मेटे महविकास आघाडीकडून निवडणूक लढतील की अपक्ष लढतील यात संभ्रम आहे. ज्योती मेटे यांनी आज शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली. यात लोकसभा निवडणुकीवरून चर्चा करण्यात आली. कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची किंवा अपक्ष उमेदवारी दाखल करायची याबाबत दोन दिवसात ज्योती मेटे निर्णय घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आपण ठाम असल्याचे मेटे यांनी म्हटले आहे.  

 

अपक्ष लढण्याचाही पर्याय

ज्योती मेटे यांच्यापुढं अपक्ष उमेदवारी करण्याचाही पर्याय आहे. सर्वच समाजाला आपलंसं करण्यासाठी त्या हा पर्याय जवळ करू शकतात. अशा वेळी महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार उभा करणार की ज्योती मेटे यांनाच पाठिंबा देणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

काय आहे सध्याची परिस्थिती?

बीड लोकसभा मतदारसंघातून महायुतीतील प्रमुख पक्ष भाजपनं पंकजा मुंडे यांची उमेदवारी घोषित केली आहे. त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. त्यामुळं ज्योती मेटे यांच्यापुढं आता महाविकास आघाडी हा पर्याय आहे. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडं (शरदचंद्र पवार) आहे. नुकतेच अजित पवार गटातून शरद पवारांकडं आलेले बजरंग सोनावणे हे देखील इथून इच्छुक असल्याचं समजतं. ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादीकडून लढण्याची इच्छा व्यक्त केल्यास शरद पवार काय निर्णय घेतात याकडं लक्ष लागलं आहे.

 

जातीय समीकरणे महत्वाचे ठरणार? 

बीड लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत जातीय समीकरणे महत्वाचे ठरणार असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे ओबीसी नेत्या म्हणून पाहिले जाते. तसेच विनायक मेटे यांचे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठं योगदान आहे. त्यातच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा सध्या मराठा आंदोलनाचा केंद्र बिंदू बनला आहे. त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असे जातीय समीकरण देखील लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.


Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.