बीड । वार्ताहर

 

बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथे एसटी बस ने प्रवास करत असलेल्या एका महिलेकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 65 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी हातोहात लंपास केला. 19 मार्च रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास मांजरसुंबा बसस्थानकात ही घटना घडली. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंद झाला.

 

गायत्री शंकर म्हेत्रे (रा.नाळवंडी, ता.बीड, हमु.तिरुपतीनगर,बीड) यांनी याबाबत तक्रार नोंदवली. त्या त्यांच्या लहान मुलासोबत एसटी बसमधून मांजरसुंबा येथून बीडकडे प्रवास करत होत्या. यावेळी त्यांच्याजवळील बॅगमध्ये ठेवलेले 63 हजार रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने आणि रोख अडीच हजार रुपयांची रक्कम अज्ञाताने चोरून नेले. या प्रकरणी त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. दरम्यान हा गुन्हा नेकनूर ठाणे हद्दीत घडला असल्याचे समोर आल्यानंतर तो नेकनूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. पोलीस हवालदार सातपुते या प्रकरणाचा तपास करत आहेत.
 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.