केजसह सावरगाव, वनवेवाडीतून लाखोंचे ऐवज लांबवला

बीड । वार्ताहर

 

जिल्ह्यात ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन ठिकाणी घरफोडी केली. केज शहरातील उमरी रोड येथे घरफोडी झाली. तर गेवराई तालुक्यातील सावरगाव येथेही घरफोडीची घटना घडली. या घटना घडत असतानाच आष्टी तालुक्यातील वनवेवाडीत चोरट्यांनी शेतकर्‍याच्या घरातून तब्बल 4 लाख 36 हजारांचा ऐवज हातोहात लंपास केला. या घटनामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलीसांनी तातडीने या प्रकरणातील चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे.

 

केज शहरातील उमरी रोड भागात राहणार्‍या दीक्षा नितीन गायकवाड यांच्या घरातून 15 मार्च रोजी पहाटे दोन ते 16 मार्चच्या सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोने व चांदीचे दागिने तसेच नगदी पाच हजार रुपये असा एकूण 52 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणी केज ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

 

दुसर्‍या घटनेत गेवराई तालुक्यातील सावरगाव येथे चोरट्यांनी 15 मार्चच्या पहाटे घराच्या दरवाज्याचा कडीकोंडा तोडून सोन्याचे दागिने व नगदी रक्कम असा 95 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सीता अंकुश नागरगोजे (रा.सावरगाव) यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गेवराई ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद झाला.

 

घरफोडीची तिसरी घटना आष्टी तालुक्यातील वनवेवाडी येथे 15 ते 16 मार्चच्या मध्यरात्री घडली. याप्रकरणी परशुराम श्रीपती माने (रा.वनवेवाडी) यांनी फिर्याद नोंदवली. चोरट्यांनी माने यांच्या घराच्या दारातून आतमध्ये प्रवेश करत कपाटात ठेवलेली 3 लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक लाख 26 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा 4 लाख 26 हजारांचा ऐवज चोरून नेला. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर माने यांनी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली या प्रकरणी घरफोेडीचा गुन्हा नोंद करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक हिंगे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.