जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या उपस्थितीत कार्यशाळा

 

 

 

बीड । वार्ताहर

 

लोकसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने कामाला लागले आहे.  गुरुवारी (दि.15) बीड लोकसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रासाठी आवश्यक असणार्‍या बाबींवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. अंतर्गत निवडणूक खर्चाची जिल्हा दरसूची निश्चित करने, माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण समिती, मतदान दिवस व्यवस्थापन, ईव्हीएम मशीन हाताळणी या विषयावरील प्रत्यक्ष सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण संपन्न झाले.

 

 

 

या प्रशिक्षण कार्यशाळेत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, अपर जिल्हाधिकारी डॉक्टर त्रिगुण कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणुकीच्या धर्तीवर नियुक्त झालेले अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. मुख्य लेखा वित्त अधिकारी सुरेश केंद्रे यांनी निवडणुकीदरम्यान उमेदवाराद्वारे केला जाणारा खर्च, त्याचे ताळेबंद शासनाच्या समोर सादर करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसे न केल्यास कायदेशीर पद्धतीने कारवाई करण्याचे नियम असल्याचेही लक्षात आणून दिले. निवडणुकीमध्ये उभे असलेले उमेदवारांनी स्वतंत्र खाते उघडून या मध्ये भारतीय निवडणूक आयोगाने ठरविलेली रक्कम 95 लाख जमा करून त्या पद्धतीने तेवढा खर्च किंवा त्यापेक्षा कमी खर्चाचे लेखाजोखा निवडणुकीच्या दिवसापर्यंत मांडणे आवश्यक असल्याचे सांगितले.
उपविभागीय अधिकारी यांनी मतदानाच्या दिवशीची व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे याबद्दलची सविस्तर माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून दिली. मतदानाच्या दिवशी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदार केंद्रात मतदान सुरू होण्याच्या दीड तासा आधी पोहोचून पोलींग बुथवर एकूण कामाची पाहाणी करून खातरजमा करावी. एकूण निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाच्या गोष्टीवर त्यांनी भर दिला जसे प्रत्येका पोलिंग बूथवर मेडिकल अधिकारी असावे अतिसंवेदशील मतदान क्षेत्रात अंधार पडण्याआधी घ्यावयाची काळजी, दिव्यांग, वृद्ध यांनी करावयाच्या मतदानतील त्यांच्या सहाय्यकाची भूमिका, मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन योग्य हाताळणे तसेच स्ट्राँग रूममध्ये येईपर्यंत घ्यावयाची काळजी याबाबत सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. ईव्हीएम मशीन व्हीव्हीपॅट यंत्रणा कशा पद्धतीने सुरू अथवा बंद करावी सील कशा पद्धतीने करावे याबाबतही प्रात्यक्षिक दाखविण्यात आली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांनी झोनल अधिकारी मतदान केंद्र व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण घेतले.

 

वस्तुनिष्ठ पद्धतीने वार्तांकन करावे

 

प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे निमसरकर यांनी माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती निवडणुकीच्या दरम्यान काय काम करते याबद्दलचे सादरीकरण केले. या अंतर्गत मुद्रित माध्यमातून तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित केल्या जाणार्‍या बातम्या माहिती कुठल्याही एका उमेदवाराला प्रोत्साहन देणारी आणि दुसर्‍या उमेदवाराला नकारात्मकता दर्शविणारी नसावी असे सांगितले. तसेच माध्यम प्रतिनिधींनी वस्तुनिष्ठ पद्धतीने वार्तांकन करावे, तसे न केल्यास निवडणुकीला प्रभावित करणार्‍या नियमाखाली कठोर कारवाईचे निर्देश असल्याची माहिती दिली. निवडणुकीच्या 48 तासा आधी आणि नंतर घ्यावयाची काळजी याबाबतही माहिती दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.