बीड । वार्ताहर
जून ते संप्टेंबर 2023 या कालावधीतील पर्जन्याची तुट, उपलब्ध असलेल्या भुजलाची कमतरता, दुरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदु आद्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची परिस्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेवून बीड जिल्हयातील वडवणी, धारूर व अंबाजोगाई या तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करून दुष्काळ घोषीत करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये पुढील सवलती लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

 

जमीन महसुलात सुट, पिक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलाते 33.5% सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता,आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंड़ीत न करणे, सदर तालुक्यातील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान अनुज्ञेय राहील.

 

बीड जिल्हयातील बीड, गेवराई, शिरूर, माजलगाव, केज,  परळी, आष्टी, पाटोदा या तालुक्यातील महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहीर करुन पुढील सवलती लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. जमीन महसूल खटला, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात 13.5% सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परिक्षा शुल्कात माफी, रोहयों अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे.

 

 

बीड जिल्हयातील वडवणी, धारूर व अंबाजोगाई या गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केलेल्या व दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहीर केलेल्या बीड, गेवराई शिरूर,माजलगाव, केज,परळी, आष्टी, पाटोदा या तालुक्यांमध्ये वरीलप्रमाणे सवलती लागू करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने गंभीर स्वरुपाचा दुष्काळ व, दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये शासन निर्णय अन्वये दिलेल्या निर्देशानुसार तात्काळ कार्यवाही अनुसरावी व जाहीर केलेल्या सवलतींच्या अनुषंगाने तात्काळ आवश्यक उपाययोजना राबवाव्यात  तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.