बीड । वार्ताहर

वाटणीपत्राआधारे दोन भावांची सातबारावर मालकी हक्कात नोंद घेण्यासाठी खासगी इसमामार्फत पंधरा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी तालुक्यातील पिंपळगावघाटचे तलाठी दिलीप विष्णू कन्हेरकर (वय -34) व खासगी इसम दिगंबर लक्ष्मण गात (वय 67 रा. पिंपळगाव घाट) यांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. दि.28 फेबु्रवारी रोजी चौसाळा (ता.बीड) येथील सुलतानपूर रस्त्यावरील तलाठी कार्यालयात ही मोठी कारवाई करण्यात आली.

 

याबाबत एसीबीच्या सुत्रांनी सांगितले, तक्रारदार यांनी त्यांच्या वडिलांच्या नावे मौजे पिंपळगाव घाट येथील शेत गट क्र. 664,676,669,681, 683, 684, 685, 687 मधील शेतजमीन वाटणीपत्रा आधारे तक्रारदार यांचे व त्यांचे भाऊ गणेश नाईकवाडे यांचे नावे खातेफोड आधारे 100 रु.चे बॅांडवर वाटणीपत्र केले होते. या वाटणीपत्राआधारे दोघा भावांची  सातबारा उतार्‍यावर मालकी हक्कात नोंद घेण्यासाठी पिंपळगावचे तलाठी कन्हेरकर यांची भेट घेतली.त्यावेळी त्यांनी या कामासाठी 17 हजार रुपयांची लाच मागितली.

 

याची तक्रार बीड एसीबीकडे संबंधित नागरिकाने केली होती. बुधवारी चौसाळा येथील आठवडी बाजार असो. एसीबीच्या पथकाने बुधवारी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली. तलाठी कन्हेरकर यांनी 15 हजारांची लाच स्वीकारण्याचे मान्य करून ती खाजगी मदतनीस दिगंबर गातच्या मार्फत घेण्याचे मान्य केल्याचे समोर आले होते. त्यानंतर एसीबीने तलाठी कन्हेरकर यांच्या चौसाळा येथील खासगी कार्यालयात सापळा लावला. तिथे दिगंबर गात यांनी तलाठी कन्हेरकरांच्या सांगण्यावरुन पंचासमक्ष 15 हजार रुपये लाच स्वीकारली त्याचवेळी ‘एसीबी’च्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर तात्काळ तलाठी कन्हेरकर यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या विरुद्ध पोलीस ठाणे नेकनूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी उपअधीक्षक शंकर शिंदे, कर्मचारी सुरेश सांगळे, हनुमान गोरे, श्रीराम गिराम, भरत गारदे,  संतोष राठोड, गणेश मेहेत्रे, स्नेहलकुमार कोरडे यांनी केली.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.