बीड । वार्ताहर
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या बीड येथील स्वा.सावरकर उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थीप्रिय शिक्षक मुकूंद देशमुख यांना भाशिप्र संस्थेच्या वतीने दिला जाणारा प्रमोद महाजन आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित झाला आहे. येत्या 11 फेबु्रवारी रोजी दुपारी 4 वा. बीड येथील स्वा.सावरकर वरिष्ठ महाविद्यालयात मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व ठिकाणचे माजी विद्यार्थी तसेच महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच शिक्षक वृंद,मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे.
संस्थेच्या विकासात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी दिलेल्या या योगदानाचा सन्मान व्हावा म्हणून भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेने शैक्षणिक वर्ष 2006-07 पासून संस्थेने माजी शिक्षक व दिवंगत पूर्व केंद्रीय मंत्री कै.प्रमोद महाजन यांच्या नावाने आदर्श शिक्षक कर्मचारी पुरस्कार देण्यास प्रारंभ केला आहे. यावर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारात बीड येथील नातू वाड्यातील स्वा.सावरकर उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक मुकूंद विठ्ठलराव देशमुख सर यांच्या संस्थेतच्या विकासातील योगदान लक्षात घेवून सन 2021-22 चा कै. प्रमोद महाजन आदर्श शिक्षक पुरस्कार घोषीत करण्यात आला आहे.
याबाबत मुकूंद देशमुख यांना दिलेल्या पत्रात म्हटले संस्थेने म्हटले आहे की, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेया सर्व संस्कार केंद्रांनी स्थापनेपासूनच उच्च शैक्षणिक गुणवत्ता तर जोपासली आहेच पण विद्यार्थ्यांमध्ये सामाजिकतेची जाण व राष्ट्रहिताचे भानही जागवण्यात यश प्राप्त केले.या सर्वांमध्ये आपल्यासारख्या तज्ञ,कर्तव्यदक्ष व समर्पित शिक्षकांचे योगदान अत्यंत अमूल्य आहे.
मुकूंद देशमुख यांना पुरस्कार घोषित झाल्याबद्दल भाशिप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलुरकर, उपाध्यक्ष जितेश चापसी,कोषाध्यक्ष अॅड.सत्यनारायण लोहिया कार्यवाह हेमंत वैद्य,आदीसह त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
Leave a comment