उपसंचालकांनी केले उद्घाटन

 

रायमोह । वार्ताहर

 शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचलित श्रीराम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कडा अंतर्गत नविन शैक्षणिक धोरण 2020 च्या निकषानुसार, तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम त्याचप्रमाणे आयसीआयसी फाऊंडेशन मार्फत खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा उद्घाटन,रेन वॉटर हार्वेस्टिंग, सीसीटीव्ही कॅमेरे सर्व वर्गामध्ये व कॉलेज परिसरात.विद्यार्थांना दिड लाख रुपयांचे पाणी फिल्टर, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी ऑनलाईन पंचीग मशीन या सर्व भेट देण्यात आल्या आहेत.आज दिनांक 20 जानेवारी  रोजी सकाळी या सर्व उपक्रमांचे उद्घाटन संपन्न झाले.

 

प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजी नगरचे  साबळे साहेब, श्रीमान वाणी साहेब सहाय्यक शिक्षण संचालक छत्रपती संभाजीनगर, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी माजी आमदार भिमरावजी धोंडे साहेब, त्याचबरोबर चेतन पाटोळे साहेब, यशवंत बहीरवाल सर, आनंदराव धोंडे कॉलेजचे प्राचार्य डॉ हरिदास विधाते सर, श्रीराम ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दानवे सर, उपप्राचार्य संजय धोंडे सर,प्रा.माऊली बोडखे,प्रा संजय शेंडे,प्रा.एच जी विधाते सर, प्राध्यापक बाळासाहेब धोंडे सर,प्रा.डॉ.मुस्ताक पानसरे, प्रा.अनिल नाईकवाडे,प्रा.मल्हारी जाधव प्रा.बन्सोडे सर,आदी सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य संजय धोंडे यांनी केले.सुत्रसंचलन प्रा.ढवळे सर यांनी केले तर आभार प्रा.अनिल नाईकवाडे यांनी मानले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.