बीड । वार्ताहर
हिंदूर्हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भगवा सप्ताह साजरा केला जात असून यामध्ये शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा तथा महिला आयोगाच्या सदस्य अॅड.संगिताताई चव्हाण यांच्याकडून पाली येथील इन्फंड इंडिया येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व फळ वाटप सप्ताह साजरा केली जात आहे.
शिवसेनेच्या विचारधारेतून 80 टक्के समाजकारण अन 20 टक्के राजकारण या तत्वावर कार्य करणार्या शिवसेना महिला जिल्हा प्रमुख अॅड.संगिताताई चव्हाण यांच्याकडून पाली येथील इन्फंट इंडियाच्या विद्यार्थ्यांना शालेय शाहित्य वाटप करत भगवा सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी इन्फंट इंडियाचे संचालक बारगजे सर, उपजिल्हा प्रमुख फरजाना शेख, उपजिल्हा प्रमुख मनोरमा डोईफोडे, विधानसभा समन्वयक कविता घोरपडे, उप तालुका प्रमुख रेखा बाळशंकर, शहर संघटक भाग्यश्री तिडके, उपशहर प्रमुख उषा वखरे, उप शहर प्रमुख लक्ष्मी ओव्हाळ यांच्यासी आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a comment