वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तम चिकटे यांचे आवाहन

माजलगाव । वार्ताहर

तालुक्यातील धरण परिस पट्ट्यातील 15 किलोमीटर परिसरात
बिबट्याचा वावर पाहता  वनविभागाने दोन पिंजरे बसविले आहेत. परिसरातील शेतकर्‍यांनी आपल्या पशुधनांना सुरक्षितस्थळी हलवून सतर्कता बाळगण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तम चिकटे यांनी केले आहे.

 

धरण पट्ट्यातील शेतकरी सध्या बिबट्याच्या दहशतीत आहेत. वनविभागाने मंगरुळ व सावरगाव परिसरात बिबट्यास पकडण्यासाठी पिंजरे बसविले आहेत.मंगरुळ येथे बसविलेल्या पिंजर्‍याकडे बिबट्या फिरकला नसून वनविभागाने परत दुसरा सावरगाव परिसरात दुसरा पिंजरा बसविला असून परिसरातील नागरीकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन  चिकटे यांनी केले आहे. आपले पशुधन उघड्यावर न ठेवता सुरक्षितस्थळी ठेवावे म्हणजे बिबट्या सावजाच्या शोधात पिंजर्‍याकडे येईल व तो कैद होईल.सध्या हल्ले झालेल्या गावाच्या परिसरातील नागरिक आपले पशु उघड्यावर बांधत असल्याने बिबट्याला सहज शिकार मिळत असल्याने बिबट्या पिंजर्‍याकडे फिरकत नसल्याने नागरिकांनी सुरक्षेबाबत सतर्कता बाळगावी. परिसरातील नागरिकांनी मिरची, बोंदरी,आईलची चिलीम आपल्या गोठ्याच्या परिसरात जाळावी म्हणजे बिबट्या परिसरात फिरकणार नाही. वनविभागाच्या दोन टिम परिसरात राञंनदिवस गस्त घालीत असून नागरीकांनीही अफवांवर विश्वास न ठेवता कुठलेही फेक व्हिडीओ व्हायरल करु नयेत जेणे करुन नागरिकांत भिती निर्माण होणार नाही. परिसरात भोंगे,फटाके वाजवावेत असे आवाहनही वनपरिक्षत्र अधिकारी उत्तम चिकटे,परीमंडळ अधिकारी दिनेश मोरे यांनी केले आहे.परिसरात वनरक्षक ए.जे.केदार,मसवले, निसर्गंध,गाडे, गुंदेकर,अंडील, सिदेश्वर चव्हाण, शाम चव्हाण हे कर्मचारी गस्तीवर आहेत.
 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.