माजलगाव |प्रतिनिधी

पहिल्या टप्यात राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील नोंदणीकृत ६४ हजार शाळांपैकी सर्वाधिक प्रभावी १०० शाळांचे कौतुक आणि सत्कार मुंबई येथे एका कार्यक्रमात केले जाणार आहे. सिंदफणा पब्लिक स्कूल राज्यातील सर्वोत्तम १०० च्या यादीत समाविष्ट आहे. त्याच बरोबर निवडक विद्यार्थ्यांना "महाराष्ट्र स्वच्छता मॉनिटर" ओळख पत्राने गौरवण्यात येणार आहे. याबद्दल सिंदफणा पब्लिक स्कूल वर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त करण्याच्या शिक्षण विभागाच्या पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचा पहिला टप्पा २ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे शाळा आणि विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात नेमके काय करायचे हे समजण्यासाठीचा महत्वपूर्ण टप्पा. कारण ह्या प्रकल्पात विद्यार्थी स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे किंव्हा संदेश देणारे दूत नसून; कळत नकळत झालेली चूक निदर्शनास आणून ती सुधारायला सांगणारे कडक मॉनिटर आहेत. प्रकल्पाचा शुभारंभ मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, शालेय शिक्षण मंत्री श्री. दीपकजी केसरकर आणि उद्योग मंत्री श्री. उदयजी सामंत यांनी केला होता. ६४ हजार शाळांची सहभागाची नोंदणी झाली आणि विद्यार्थी वाटेल तिथे कचरा टाकणाऱ्यांना आणि बेफिकीर थुंकणाऱ्यांना जागच्या जागी थांबवून झालेली चूक दाखवून देत होते. विद्यार्थ्यांने "गांधीगिरी" करत इतरांने केलेली घाण साफ करणे अपेक्षित नसून, 'लेट्स चेंज' फिल्म मधील "सरदार पटेलबाजी" करत घाण करणाऱ्यालाच साफ करायला विनंती करणे अपेक्षित आहे. स्वच्छता मॉनिटरगिरी म्हणजे सफाई करणे किंव्हा भाषणबाजी नसल्यामुळे मुलांना मजा येते. आणि त्यापुढे घटनेचे विवरण सांगतानाचे मजेशीर व्हिडिओ करून सोशल मीडिया ला शेअर करणे त्यांच्या आवडीचे काम बनून जाते. पहिल्या टप्प्यात असे १५ लाख हुन अधिक विडिओ शेअर झाले आहेत. शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी प्रस्तावित केलेल्या संकल्पनेला गती मिळालेली आहे, आणि “दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर गिरी करण्याची सवय होण्यावर लक्ष्य केंद्रित होणार आहे. ठिकठिकाणी / प्रत्येक चुकीला कोणी ना कोणी निदर्शीत केले तर सगळेच जास्ती जागरूक राहतील, आणि महाराष्ट्र निष्काळजी मुक्त बनेल” अशी माहिती प्रकल्प संचालक रोहित आर्या ने दिली आहे. 
शाळेचे मुख्याध्यापक अन्वर शेख यांनी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर बनवून जागो जागी बेफिकीर लोकांना थांबवण्यास प्रोत्साहित केले, आणि शाळा समन्वयक अजयकुमार सावंत, पोन्नी पोनंन आणि सर्व वर्ग शिक्षक नियमित विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून, त्यांचे अनुभव ऐकून त्यांना मार्गदर्शन देत होते. 

शाळेच्या या यशाबद्दल संस्थेच्या  सचिव मंगल सोळंके, समन्वयक नीला देशमुख, प्राचार्य अन्वर शेख, उपप्राचार्य राहुल कदम यांनी उपक्रमात सहभागी शिक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.