जास्तीत जास्त शाळेने सहभागी होण्याचे आवाहन

बीड प्रतिनिधी

बीड शहरातील किशोरी इंग्लिश स्कुल येथे भव्य फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन दि. 16 ऑक्टोंबर 2023 रोजी करण्यात आले आहे.
या स्पर्धेत स्पर्धक आपल्या आवडीच्या विषयाला अनुसरून पात्र निवडू शकतात.

या बाबद अधिक असे की, या स्पर्धेत बीड शहरातील सर्व नामांकित मराठी व इंग्रजी प्राथमिक शाळांचा समावेश करण्यात येणार आहे. तरी आपल्या शाळेचा या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन किशोरी इंग्लिश स्कूल च्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रवेश शुल्क दि. 04.10. 2023 ते 15.10. 2023 रू. 150/-, स्पॉट एन्ट्री फिस रू. 200/-, ही स्पर्धा दोन गटात होईल यामध्ये  वय वर्ष 4 से 6 (लहान गट),  वय वर्ष 7 ते 10 (मोठा गट) स्पर्धेच्या विषयाला कोणतीही अट नाही. बक्षिस छोटा गट व मोठा गट प्रत्येकी प्रथम पारितोषिक रू. 3100 /- सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र 2) व्दितीय पारितोषिक रू. 2100/- सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक रू. 1100/- सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र,  स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व बालकलाकारांना प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहितीसाठी सौ. सपना लद्दड मो. 9404025072, सौ. ऋतुजा शहाणे 7028935230 यांच्याशी संपर्क साधावा, ही स्पर्धा किशोरी इंग्लिश स्कूल (राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय), सारडा कॅम्पस, एम.आय.डी.सी. रोड बीड. येथे होणार असल्याची माहिती किशोरी इंग्लीश स्कूल प्राचार्य यांनी दिली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.