बीड | वार्ताहर

स्त्री भ्रूण हत्येचा कलंक लागलेल्या बीड जिल्ह्यात स्त्री अर्भक फेकून देण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. बीड शहरातील जालना रोड लगत एका बादलीमध्ये अर्भक आढळून आल्याचा प्रकार आज 3 ऑगस्ट रोजी सकाळी समोर आला आणि या घटनेनंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही केली.

बीड शहरातील जालना रोड परिसरातील साई विठ्ठल प्रतिष्ठान समोरील मोकळ्या जागेमध्ये अर्भक आढळून आले. बादलीमधील अर्भक पूर्ण झाकल्यामुळे हे अर्भक स्त्री जातीचे आहे का? पुरुष जातीचे हे मात्र समजू शकले नाही. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.