पणजी :

 

पणजी ऐवजी बिचोलीतून उमेदवारी घ्यावी हा भाजपचा प्रस्ताव उत्पल पर्रिकर यांनी नाकारला असून आता ते पणजीतून अपक्ष लढणार आहेत. तशा प्रकारची घोषणा त्यांनी केली. उत्पल पर्रिकरांचा हा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का असल्याचं सांगण्यात येतंय. उत्पल पर्रिकर हे भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र आहेत. 

गोव्यासाठी भाजपकडून 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या या यादीत पणजीतून उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्याऐवजी त्यांना बिचोलीतून निवडणूक लढवण्याचा पर्याय देण्यात आला होता. त्यामुळे उत्पल पर्रिकरांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. 

माझी भूमिका ठाम आहे, मी पणजीतूनच लढणार. दुसऱ्या जागेवरुन लढण्याचा कुठलाही विचार नाही अशी भूमिका उत्पल पर्रिकरांनी या आधीच मांडली होती. 

भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले मनोहर पर्रिकर हे पणजी मतदारसंघातून सातत्याने निवडून येत होते. मात्र मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पणजी मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. तर काँग्रेसचे बाबुश मोन्सेरात विजयी झाले होते. मात्र नंतर मोन्सेरात यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. आता भाजपाने उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारत मोन्सेरात यांनाच उमेदवारी जाहीर केली. तसेच उत्पल पर्रिकर यांच्यासमोर पणजीऐवजी इतर मतदारसंघातून लढण्याचा पर्याय पक्षनेतृत्वाने दिला होता. मात्र उत्पल पर्रिकर पणजीतून निवडणूक लढवण्यावर ठाम होते. अखेरीस त्यांनी पणजीतून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.  

दरम्यान, उत्पल पर्रिकरांनी पणजीतून उमेदवारी अर्ज भरला तर शिवसेनेचे उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर आपली उमेदवारी मागे घेतील आणि शिवसेना उत्पल पर्रिकरांच्या मागे राहिल असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. 

 

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले  ”मी भाजप विरोधात नाही, मात्र तत्त्वांसाठी माझी लढाई आहे.” ते म्हणाले, भाजप माझ्या मनात कायम आहे, रोजच असणार आहे. मात्र भाजपने मला सोडलं आहे का, हे त्यांना विचारा, असं पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना उत्पल म्हणाले आहेत. तसेच भाजप सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार का, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले की, ”मी माझ्याच पक्षाची ऑफर नाकारली तर दुसऱ्यांची ऑफर काय घेणार.”

पणजीतून अपक्ष लढणार असल्याची घोषणा करताना ते म्हणाले की, ‘माझ्या वडिलांसोबत पणजीतील जनता गेले 30 वर्षांपासून होती, आताही ती आहे की नाही हे पुढे समजेल.” दरम्यान, उत्पल पर्रिकर यांची भाजपच्या तिकिटावर पणजीतून निवडणूक लढवण्याची इच्छा होती. मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारत या जागेवरून विद्यमान आमदार बाबुश मोन्सेरात यांनाच पुन्हा तिकीट दिले. त्यानंतर आता उत्पल यांनी पणजीत अपक्ष उमेदवार म्हणून लढणार असल्याची घोषणा केली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.