वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान
आष्टी । वार्ताहर
माजी आ.भीमसेन धोंडे यांनी आष्टी, पाटोदा व शिरुर कासार या तीनही तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांसाठी सुरु केलेल्या अविरत अन्नसेवाला आज शंभर दिवस पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी, वॉर्ड बॉय, नर्सेस युवा नेते अभयराजे धोंडे यांनी सन्मान केला.
बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा व शिरुर या तीनही तालुक्याच्या ठिकाणी भाजपाचे जेष्ठ नेते मा.आ.भीमसेन धोंडे यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणार्या कोरोना बाधित रुग्णांसाठी एक वेळच्या जेवणाची सोय करत सुरु केलेल्या अविरत अन्नसेवेला आज शंभर दिवस पूर्ण झाले असून त्यानिमित्त आज दि.15 जुन रोजी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे मा.आ.भीमसेन धोंडे यांचे चिरंजीव युवा नेते अभयराजे धोंडे यांच्या हस्ते कोरोना काळात सेवा देणार्या वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. कोरोनाच्या भयान काळात आपल्या जीवाची पर्वा न करता समर्थपणे आपली बाजू समर्थपणे संभाळल्यानेच आज आपण हे जग पाहत आहोत. अशा निस्वार्थपणे सेवा बजाविणार्या वैद्यकीय क्षेञातील कर्मचार्यांचे कौतुक करण्यासाठी समाजाने पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन युवानेते अभयराजे धोंडे यांनी केले आहे. या कार्यक्रमास आष्टी ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.राहूल टेकाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन मोरे,
वैद्यकीय अधिकारी डॉ.रामदास मोराळे, डॉ.गणेश फुंदे, डॉ.पाटील, डॉ.अमित डोके, डॉ.निखील गायकवाड, डॉ.नागेश करांडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष अँड.हनुमंतराव थोरवे, उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे, शहराध्यक्ष बाबू कदम, अँड.रत्नदिप निकाळजे, एन.टी.गर्जे, पत्रकार उत्तम बोडखे, माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे, सरपंच संजय नालकोल, संभाजी जगताप, बबन सांगळे, अज्जूभाई शेख, जाकिर कुरेशी, माजी सरपंच आण्णासाहेब लांबडे, अतुल मुळे, अस्लम अत्तार, अस्ताक शेख, राजू घुले, सागर वनवे, विजय वनवे, वसंत गिते, देवेश शेटी यांच्यासह तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अभयराजे धोंडे म्हणाले, गेल्या वर्षभरापासून देशासह जगावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. या संकट काळात आपल्या कुटूंबाचा कसलाही विचार न करता राञदिवस रूग्णांची सेवा करणार्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचा कोरोना सारख्या भयान रोगाला हरविण्यात मोलाचा वाटा आहे. एखाद्या चुकीचे काम करणार्या वैद्यकीय कर्मचार्यांमुळे सगळ्याच कर्मचार्यांना दोषी न ठरविता आपण सर्वांनी या वैद्यकीय सेवेत काम करणार्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे.
Leave a comment