मुंबई । वार्ताहर

करोनामृत्यू दडवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला असतानाच आज सरकारने केलेल्या फेरपडताळणीअंती मुंबई व राज्यात 1328 अधिक करोनामृत्यू आढळून आले असून करोनामृत्यूंचा आकडा वाढून आता 5456 इतका झाला आहे. दरम्यान, आज जे अधिकचे मृतदेह नोंदवले गेले आहेत त्यांना फेरपडताळणीचे गोंडस नाव न देता हे आकडे लपवणार्‍यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

कोविड-19 रुग्णासंदर्भातील माहिती विविध जिल्ह्यांतील रुग्णालयांमधून पोर्टलवर भरण्यात येते. राज्य शासन या माहितीची स्वत:हून फेरतपासणी करते. ही माहिती मग वेबपोर्टलवर सार्वजनिक केली जाते. त्यामुळे आकडेवारीत वाढ दिसली तरी हेतुबाबत शंका घेण्याचे कारण असू नये, असे सुधारित आकडेवारी देताना राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नोंदी कमी संख्येने दाखविण्यात आल्याबद्दल प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे. याबाबत राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की, जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर तसेच नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल यांनी ठरवून दिलेल्या आयसीडी-10 मार्गदर्शक तत्वांनुसार कोविड बाधित मृत्यू प्रकरणांची कार्यवाही केली जाते. त्याचे पालन करणे बंधनकारक आहे, या आधारे तसेच राज्य शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे मार्च, 2020 पासून कोविड-19 प्रकरणांची पडताळणी करण्यात येत आहे. 11 जून रोजी राज्य शासनाने जिल्हा यंत्रणांना समायोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचा तपशील हाती आला आहे, असे मेहता यांनी नमूद केले.

राज्यात सोमवार 15 जूनपर्यंत 1 लाख 10 हजार 744 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यापैकी 50 हजार 554 क्टिव्ह रुग्ण आहेत व 4 हजार 128 मृत्यूंची नोंद घेण्यात आली आहे आणि 56 हजार 49 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. परंतु राज्य शासनाने या डाटामध्ये फेरतपासणी केली असता मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आणखीन 862 मृत्यू आढळून आले तर राज्याच्या अन्य भागांत आणखी 466 मृत्यू आढळले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये मृत्युसमयी कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला होता व या सर्व प्रकरणांची नोंद डेथ इन कोविड पॉझिटिव्ह म्हणून घेण्यात आली आहे, असे मेहता यांनी नमूद केले. फेरतपासणीमध्ये अहमदनगर 1, अकोला 14, अमरावती 6, औरंगाबाद 33, बुलढाणा 2, धुळे 12, जळगाव 34, जालना 4, लातूर 3, नांदेड 2, नाशिक 28, उस्मानाबाद 3, पालघर 11, परभणी 1, पुणे 85, रायगड 14, रत्नागिरी 1, सांगली 4, सातारा 6, सिंधुदूर्ग 3, सोलापूर 51, ठाणे 146, वाशिम 1, यवतमाळ 1 अशा अधिकचे मृत्यू आढळले आहेत, असे मेहता यांनी सांगितले.

दोषींवर कारवाई झालीच पाहिजे- फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच मुंबईतील आकडेवारीवर साशंकता व्यक्त केली होती. किमान 950 मृत्यूंची नोंदच नसल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर सरकारच्या पडताळणीत या दाव्यात सत्यता आढळून आल्याने फडणवीस यांनी अधिक आक्रमक होत कारवाईची मागणी लावून धरली आहे. या सार्‍या प्रक्रियेला आकड्यांच्या फेरपडताळणीचे गोंडस नाव न देता, गेले 3 महिने ही आकडेवारी लपविणार्‍यांवर काय कारवाई करणार, हे सांगितले गेले पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.