मुंडे भगिनींना आत्मचिंतनाचीं गरज..!

माजलगाव / उमेश जेथलिया

     माजलगाव शहरासारख्या संघ आणि भाजपाचे 500 कुटुंब व 15000 पारंपरिक (शेठजी/भटजी/ओबीसी) मतदार असलेल्या सुपीक राजकीय जमिनीवर 26 पैकी केवळ 1 कमळाचे फुलं उगवता आले या पेक्षा मोठी नाचक्की गल्ली ते दिल्ली सत्ता असणाऱ्या भाजपसाठी दुसरी कोणतीच असू शकत नाही.माजलगाच्या सुपीक जमिनीत कमळ उगवू न देण्याचे पाप पक्षातील डबल गेमर मुळे होणार हे भाकीत सुद्धा "लोकप्रश्न" ने निकालाच्या एक दिवस अगोदर वर्तवले होते.

       दोन्ही राष्ट्रवादीच्या दोन दोन उमेदवारांनी निवडणूक लढवून भाजपा साठी सोपी केलेली निवडणूक असताना झालेला पराभव हा केवळ "भाजपच्या लाटेवर स्वार "होण्याची दिवा स्वप्न पाहणाऱ्या, हिंदू मतदारांना गृहीत धरणाऱ्या, जनतेचे काम कमी करणाऱ्या आणि चकाट्या ज्यास्त पिटणाऱ्या, मोदी -मुंडे -फडणवीसयांच्या पुण्याई वर सत्ता काबीज करायचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपच्या तमाम पदाधिकारी व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना जोराची चपराक आहे.

    केवळ सोशल मीडियावर पक्षाचे काम केले म्हणजे आपण जनतेत आहोत असा गैरसमज असणारे अनेक "फेसबुके" उमेदवार स्थानिक व वरिष्ठ पदाधिकारी यांनी अर्थपूर्ण व्यवहारातून सुचवले  पण प्रभागातील 25% मतदारांशी पण त्यांचा संपर्क नव्हता हे प्रचारदरम्यान जाणवले.याचा पण फटका पक्षाला बसला आणि हिंदू बहुल वॉर्डात पण तोंडावर आपटावे लागले.याचा मोठा फटका नगराध्यक्ष उमेदवाराला पण बसला.

        माजलगाव भाजपा मध्ये असलेली ही बेबंदशाही 2007ला आ प्रकाश सोळंके नी भाजपा सोडली तेव्हापासून आहे.2014 ला आर टी देशमुख आमदार झाल्यानंतर या बेबंदशाही पोटी आणि पक्षातील "डबल गेमर" आणि बुद्धिभेद करणारा मुळे त्यांनी चाऊस यांना भाजपचा पाठिंबा देऊन पक्षाची इज्जत वाचवली होती. नाहीतर पक्षातील अनेक "डबलगेमर" मुळे आजची ही वेळ 2016 लाच आली असती. पक्षातील या "डबल गेमर" लोकांना स्व मुंडेसाहेबही ओळखू शकले नसतील किंवा ओळखूनही त्यांनी सुधरतील या भावनेने वेळीच पायबंद घातला नसेल ते कठीण काम आता मुंडे भगिनींना करावे लागणार आहे.

 

 

प्रदेश पदाधिकाऱ्याच्या वॉर्डात तुतारी वाजली..

   प्रभाग पाच मध्ये 2952 पैकी 2200 मतदार भाजपचे पारंपरिक व मुंडे साहेबांना मानणारा मतदार,पक्षाचे चार प्रदेश पदाधिकारी, 5 शहर पदाधिकारी, संघांचे 10 पदाधिकारी, भाशिप्रचें 15 कर्मचाऱ्यांचे कुटुंब असताना भाजपचे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झाले याचें चिंतन होणे गरजेचे आहे.

संध्या मेंढके "झाशीच्या रानी"सारखी लढली

    नगराध्यक्ष पदाची उमेदवार कु संध्या मेंढके वयमान अवघ 25 ही नसेल, राजकीय अनुभव नसल्यात जमा तरी पायात भिंगरी बांधल्यागत आणि एखाद्या कसलेल्या राजकारण्यागत तिने केवळ 12 दिवसाच्या अल्पकाळात स्वतः उमेदवार म्हणून झाशीच्या रानी गत इतर उमेदवारपेक्षा चारपट ज्यास्त प्रचार केला, मेहनत घेतली.प्रभागातील इतर उमेदवाराची हवी तशी साथ तिला मिळाली नाही शिवाय भाजपा सारख्या सत्ताधारी पक्षाने बंडखोरी टाळन्याच्या नादात शेवटच्या दिवशी उमेदवारी जाहीर केली यामुळे नियोजन करण्यासाठी कमी वेळ मिळाला हे सुद्धा एक कारण कु संध्या मेंढके यांच्या पराभवाचे आहे.

 

तिकीट विकल्याचीं चर्चा आणि विरोधकांशी संधान

      विरोधी पक्षातील उमेदवारा विरोधात भाजपचा कच्चा उमेदवार देण्यासाठी काही प्रभागात डील झाली असल्याची चर्चा दबक्या आवाजात प्रचारदरम्यान होती. शिवाय भाजपच्या काही पदाधिकाऱ्याचे केसापुरी च्या बंगल्यावर तर काहीचें रेस्ट हाऊस च्या कार्यालयात असलेल्या विरोधकांशी संधान असल्याचे जगजाहीर असून निम्मी भाजपा पक्षापेक्षा विरोधकांसाठी काम करते असं भाजपा च्या गोटात बोलले जाते.हे सुद्धा परभवाचे मोठे कारण आहे.

नाईकनवरे सारखा "कोहिनुर " ओळखा

       नितीन नाईकनवरे सारखा कोहिनुर हिरा भाजपा कडे असून "तुज आहे तुज पाशी परी तू जागा चुकलासी" असे म्हणण्याची वेळ आज भाजपवर आली आहे. अजूनही वेळ गेली नसून भाजपची माजलगाव मतदार संघची एकहाती सूत्रे नितीन नाईकनवरे या परिपकव नेतृत्वाकडे पक्षाने सोपवली तर येणाऱ्या जीप पंस निवडणुका व भाजपची संघटनात्मक बांधणी मजबूत होऊ शकते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.