दर्जेदार वैद्यकीय शिक्षणासह माजलगाव तालुक्याच्या विकासासाठी कायम कटिबद्ध-डॉ.राजेभोसले
माजलगाव । वार्ताहर
वैद्यकीय क्षेत्रात दर्जेदार शिक्षणाचा ठसा उमटवणारे डॉ. यशवंत राजेभोसले यांच्या गुरुकृपा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला नुकतीच आयुर्वेद मेडिकल कॉलेजची मान्यता भेटली आहे. प.पु. अण्णासाहेब मोरे आयुर्वेद मेडिकल कॉलेजला केंद्र, राज्य शासन तसेच नाशिक विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे. यामुळे ग्रामीण भागातून शिक्षण घेणार्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाचे नावे दालन खुले झाले आहे. या आयुर्वेद कॉलेजमुळे माजलगाव तालुक्याच्या शैक्षणिक विकासात मोठी भर पडणार असून दर्जेदार शिक्षणासह तालुक्याच्या विकासासाठी कायम कटिबद्ध असल्याचे डॉ. यशवंत राजेभोसले यांनी सांगितले.
माजलगाव सारख्या ग्रामीण भागात गुरुकृपा सेवाभावी संस्थेमार्फत डॉ. यशवंत राजेभोसले मागील दहा वर्षापासून वैद्यकीय शिक्षणाचा वसा चालवतात. डी. फार्मसी, बी. फार्मसी, फिजीयो थेरपी, बीएस्सी नर्सिंग आदी वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असलेले शैक्षणिक दालन उभा करून गुरुकृपा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट दर्जेदार शिक्षण देत आहे. याच ग्रुपला आता प.पु. अण्णासाहेब मोरे आयुर्वेद मेडिकल कॉलेजला केंद्र, राज्य शासन व नाशिक विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे. यामुळे माजलगाव सारख्या ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे एक नवे दालन खुले झाले आहे. सि.ई.टी. सेलच्या माध्यमातून या आयुर्वेद कॉलेजला ऑनलाईन प्रवेश घेता येणार असून 60 विद्यार्थी क्षमता असलेल्या या आयुर्वेद कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना निवास, भोजनासह तज्ञ प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण मिळणार आहे.
आयुर्वेद कॉलेजला मान्यता मिळाल्यानंतर डॉ. यशवंत राजेभोसले म्हणाले की, मागील 15 वर्षांपासून यशवंत हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा देण्यात येत आहे. माजलगाव सारख्या ग्रामीण भागात आयुर्वेदिक कॉलेज सुरु व्हावे यासाठीच्या प्रयत्नाला यश मिळाले मसून प.पु. गुरुमाउली आयुर्वेद कॉलेजला मान्यता मिळाली आहे. या महाविद्यालयात पंचकर्म व आयुर्वेदिक व्यवस्थापनच्या माध्यमातून शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहेत. माजलगाव तालुक्याच्या वैद्यकीय शिक्षणाच्या विकासात भर घालणार्या या आयुर्वेद कॉलेजमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कायम कटिबद्ध असल्याचेही डॉ. राजेभोसले यांनी सांगितले.
Leave a comment