बीड । वार्ताहर
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय बीड च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बीड जिल्ह्यात मुलींच्या जन्माचे स्वागत व महिला आरोग्य तपासणी शिबीर उपक्रमाची सुरुवात झाली. माविम जिल्हा कार्यालय बीडच्या संकल्पनेतुन लोकसंचलित साधन केंद्र व स्वयंसहाय्य महिला बचतगटाच्या सहकार्याने मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी माविम कार्यक्षेत्रात बचतगटातील गरजू महिलांच्या 6 महिने ते 10 वर्षाच्या आतील मुलींसाठी सुकन्या योजने खाते काढून देण्यात येत आहे. डिसेंबर 2022 ते मार्च 2023 पर्यंत किमान 2000 मुलींचे सुकन्या योजनेचे खाते काढून देण्यात येणार आहे.याची सुरुवात बीड जिल्ह्यातील माविम कार्यक्षेत्रात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त सुरुवात करण्यात आली.
याअंतर्गत महिलांमधील ऍनिमियाचे निर्मूलन करण्यासाठी बीड जिल्ह्यातील 20 हजार महिलांचे हिमोग्लोबिन व आरोग्य तपासणी करून त्यांना हेल्थ कार्ड वाटप करण्याची सुरुवात माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथून करण्यात आली. या आरोग्य शिबीरा मध्ये महिलांचे एच.बी. थायरॉईड,बी.पी. बीएमआय, सीबीसी,शुगर इत्यादी तपासणी करण्यात आले. यावेळी माविम चे जिल्हा समन्वय अधिकारी एस.बी. चिंचोलीकर, लेखाधिकारी सी आर मुंजेवार, डॉ. ए. एम. गोले (वैद्यकीय अधिकारी), डॉ. रोहिणी जोमेगावकर (समुदाय आरोग्य अधिकारी), श्रीमती वच्चला फोले व श्रीमती सोनाली जयस्वाल (ए. एन. एम.), रमेश रासवे (लॅब टेक्निशियन), सी एम आर सी अध्यक्ष कालिंदा अलगुडे, व्यवस्थापक उषा राठोड, सविता, औटी, वैशाली नाईकनवरे,सर्व सहयोगिनी, भागवत गायकवाड, संतोष ठाकूर इत्यादी उपस्थित होते.
Leave a comment