आष्टी । वार्ताहर
राजकीय सामाजिक धार्मिक वैचारिक पत्रकारिता, कृषी, शिक्षण, साहित्य संस्कृती आदीसह विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी आणि योगदान देणार्या गुणवंत जणांना गंगाई - बाबाजी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हे व्यासपीठ शेतकरी, कामगार, विद्यार्थी युवकांसह रसिक प्रेक्षकांना मोठी मेजवानी असणार आहे.आष्टी येथील शेतकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे यांच्या आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ आष्टी येथील भगवान महाविद्यालयात आयोजित 17 व्या.गंगाई-बाबाजी सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन बुधवार दि.18 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता मराठवाड्यातील प्रसिद्ध साहित्यिक दासु वैद्य यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षणमहर्षी माजी आ.भीमराव धोंडे हे राहणार आहेत अशी माहिती गंगाई-बाबाजी महोत्सवा संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ यांनी दिली. या महोत्सवात महाविद्यालयीन वतृत्व स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत ’कृषीप्रधान भारतात शेतकर्यांचे रोजच मरण, कोरोनानंतरचे मानवी जीवन आणि समाजमाध्यामाच्या विळख्यातीला जग’ या सामाजिक विषयावर स्पर्धा होणार आहेत.प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक विजेत्या स्पर्धकास अनुक्रमे 7 हजार ,5 हजार आणि 3 हजार रुपये रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत काव्यवाचन स्पर्धा होणार आहे. गुुरूवार दि.19 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. खुल्या लोकगीत गायन स्पर्धा दुपारी 3 वा.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम तर सायंकाळी 5 वा. वाजता खुल्या लावणी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार दि.20 जानेवारी रोजी महोत्सवाचा समारोप,बक्षीस वितरण,गंगाई -बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार वितरण सोहळा प्रसिध्द अभिनेत्री डॉ.निशीगंधा वाड यांचे हस्ते आणि माजी आ.भीमराव धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण होईल. या महोत्सवानिमित्त होणार्या सर्वा सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीचे सदस्य प्रा.डॉ.बाळासाहेब गावडे, उपप्राचार्य डॉ.आप्पासाहेब टाळके, प्रा.डॉ.ज्ञानदेव वैद्य, पं.नेहरु कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य दत्तात्रय रेडेकर, प्रा.आबासाहेब पोकळे यांनी केले आहे.
वक्तृत्व, काव्यवाचन व लोकगीत गायन स्पर्धा!
कित्येक वर्षाची परंपरा असलेला आणि हजारो वर्षीच प्रेक्षकांना आकर्षण राहणार गंगाई बाबाजी महोत्सव यंदा धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे दरम्यान काव्यवाचन वक्तृत्व लोकगीत गायन स्पर्धेसह विविध स्पर्धांचे आयोजन विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना देण्यासाठी केल्या जाणार आहेत. त्यातील विजेत्यांना मान्यवर पाहुण्यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
Leave a comment