आयपीएस धीरजकुमार बच्चू यांच्या पथकाची कारवाई

अंबाजोगाई । वार्ताहर

गुप्त माहितीच्या आधारे सहा. पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांच्या पथकाने अंबाजोगाईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारून मटका आणि ऑनलाईन बिंगो जुगार खेळणार्‍या तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 68 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अंबाजोगाईत सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश सहा. पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनी त्यांच्या पथकाला दिले होते. यावेळी पथकाला अंबाजोगाई बसस्थानकासमोरील पान टपरीतून मटका सुरु असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मंगळवारी रात्री 9 वाजता सदर टपरीवर छापा मारला असता मटका लावणारे पळून गेले मात्र मटका घेणारा अफसर अब्दुल रशीद यास ताब्यात घेत पोलिसांनी त्याच्याकडून दिड हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दुसर्‍या घटनेत याच पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अंबाजोगाईतील सदर बाजार नाका येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या ऑनलाईण जुगार सेंटरवर छापा मारला. यावेळी पोलिसांनी बिंगो नावाचा ऑनलाईण जुगार खेळवणारे रतन मनोहर कहेकर (रा. पंचशील नगर) आणि शेख सलीम अब्बास (रा. सदर बाजार ) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम आणि संगणक असा एकूण 67 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही छाप्यातील तिन्ही आरोपींवर सहा. फौजदार बालासाहेब फड यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. ही कारवाई पोलीस उपनिरिक्षक सोनेराव बोडखे, सहा. फौजदार बालासाहेब फड, कांगणे, सपकाळ यांनी पार पाडली.
----------

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.